Nagpur: वन समितीचा अध्यक्षच अडकला तस्करीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वन समितीचा अध्यक्षच अडकला तस्करीत

नागपूर : वन समितीचा अध्यक्षच अडकला तस्करीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कुंपणच जर शेत खात असेल तर काय म्हणावे? होय, पण असे घडले आहे. वाघांच्या अवयवांची तस्करी प्रकरणात संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षालाच अटक करण्यात आली आहे. राजू कुळमेथे असे त्यांचे नाव असून अन्य चार व्यक्तींनाही अटक झाली आहे.

उमरेड बसस्थानकाजवळ वाघाच्या अवयवांची तस्करी केली जाणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार २३ नोव्हेंबरला वन विभागाच्या दक्षिण उमरेड वन परिक्षेत्राच्या पथकाने सापळा रचला आणि तीन आरोपींना अटक केली. अटक केल्यानंतर आरोपींची तपासणी आणि चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मेळघाट सायबर सेलच्या मदतीने आणखी दोन जणांना अटक केली.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ताराचंद महादेव नेवारे (४१, खडकळा), दिनेश कवटु कुंभले (वय ३० रा. वाढोणा), अजय भानारकर (२४, वाढोणा), प्रेमचंद वाघाडे (५० रा.सोनपूर), राजू कुळमेथे (खडकळा) अशी आहेत. सर्वच आरोपी नागभीड जि. चंद्रपूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या विरुद्ध वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कार्यवाही मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार, उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्ष क एन.जी. चांदेकर, वन परिक्षेत्र अधिकारी कोमल गजरे यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी कामगिरी केली.

loading image
go to top