Nagpur Gangwar
Nagpur Gangwar Esakal

Nagpur Gangwar: 'मी गोळीबार केलाच नाही', शादाबकडून नकार; पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू

हद्दीतील कामगारनगरात गोवंश तस्करीतून देशीकट्ट्यातून तीन राऊंड फायर केल्याची बाब समोर आली. मात्र, आता त्यातील मुख्य आरोपी असलेल्या शादाबकडून गोळीबार केलाच नसल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

Nagpur Beef Smuggling Syndicate Gangwar: हद्दीतील कामगारनगरात गोवंश तस्करीतून देशीकट्ट्यातून तीन राऊंड फायर केल्याची बाब समोर आली. मात्र, आता त्यातील मुख्य आरोपी असलेल्या शादाबकडून गोळीबार केलाच नसल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांना धक्का बसला आहे.

सोनू बंदर ऊर्फ शेख इमरान अब्दुल सत्तार शेख (वय २३, रा. कामगारनगर, नारी रोड, कपीलनगर) हा अमजद शेख वल्द शब्बीर शेख, वसिम नसिम खान, आरान वल्द मुख्तार शेख यांच्यासह मोमीनपुऱ्यातून नमाज अदा केल्यावर कामगारनगर येथे भावाकडे येत होता. दरम्यान तो पेट्रोल भरण्यासाठी कामठी मार्गावरील मोहम्मद अली पेट्रोल पंपावर गेला.

तेव्हाच शादाबसह सहा ते सात जण आले. त्यांच्याजवळ पिस्तुलासह तलवारी आणि इतर घातक शस्त्र होते. शादाबने सोनूला शिवीगाळ केली आणि खिशातून पिस्तूल काढून सोनू बंदर याच्यावर तीन राऊंड फायर केले.(Latest Marathi News)

मात्र, त्या चुकल्याने सोनू तीन मित्रांसह पसार झाला. मात्र, अमजद शेख वल्द शब्बीर शेख त्यांच्या तावडीत सापडला. त्याला शादाबने पिस्तुलाच्या मुठीने डोक्यावर आणि पाठीवर वार करीत जखमी केले आणि पसार झाले. दरम्यान शादाब याल तहसीलमधून अटक करण्यात आला होती. सध्या त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

Nagpur Gangwar
Satyendra Jain: दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा तुरुंगवास निश्चित; तातडीनं आत्मसमर्पणाचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

मात्र, चौकशीदरम्यान त्याने गोळीबार केलाच नसल्याचे सांगितले. याशिवाय पिस्तुल असल्यास फायटरने का मारले असते? असा सवालही त्याने उपस्थित केल्याचे त्याने सांगितले. मात्र, पोलिसांकडून गोळीबाराचा दावा करण्यात आला असून त्याच दिशेने कपिलनगर पोलिसांचा तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेत आहे. (Latest Marathi News)

Nagpur Gangwar
Satyendra Jain: दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा तुरुंगवास निश्चित; तातडीनं आत्मसमर्पणाचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com