G.N Saibaba Acquittal: सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका, साईबाबांच्या निर्दोषत्वाच्या स्थगितीबाबत दिला महत्वाचा निर्णय

प्रा. जी. एन. साईबाबांसह त्यांच्या पाच सहकाऱ्यांचा अपील अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर करीत ५ मार्च रोजी त्यांना निर्दोष मुक्त केले होते. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या राज्य शासनाला दणका बसला असून निर्णयावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
Nagpur News
Nagpur News Esakal

Supreme Court on GN Saibaba Release: बेकायदा कारवाई (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) दोषी ठरविण्यात आलेले कथित माओवादी समर्थक प्रा. जी. एन. साईबाबांसह त्यांच्या पाच सहकाऱ्यांचा अपील अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर करीत ५ मार्च रोजी त्यांना निर्दोष मुक्त केले होते. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या राज्य शासनाला दणका बसला असून निर्णयावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

या प्रकरणावर न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या समक्ष सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनातर्फे दाखल करण्यात आलेल्या विशेष विनंती याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्णयातील मुद्दे अतिशय योग्य असल्याचे मत नोंदविले. या दोषींना अटक करताना यूएपीए कायद्यातील अटींचे पालन झालेले नाही. तसेच, अटक करण्यापूर्वी आवश्‍यक असलेली मंजुरी देखील घेण्यात आलेली नाही.

याच आधारे उच्च न्यायालयाने दोन वेळा दिलेल्या निर्णयामध्ये दोषींना निर्दोष मुक्त केले आहे. त्यामुळे, उच्च न्यायालयाने दिलेले निर्णय योग्यच असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये व्यक्त केले. यावर, अतिरिक्त दस्तऐवज दाखल करण्यासाठी वेळ देण्याची विनंती राज्य शासनातर्फे करण्यात आली. परंतु, आदेशाला स्थगिती न देता या निर्णया विरोधात अपील अर्ज करण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली व राज्य शासनाने दाखल केलेली विनंती याचिका फेटाळली. (Latest Marathi News)

त्यामुळे, प्रा. गोकराकोंडा नागा साईबाबा (वय ४९, रा. वसंत विहार, दिल्ली) यांच्यासह महेश करीमन तिरकी (वय २४, रा. मुरेवाडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली), पांडू पोरा नरोटे (वय २९, रा. मुरेवाडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली), हेम केशवदत्त मिश्रा (वय ३४, रा. कुंजबरगल, अल्मोडा, उत्तराखंड), प्रशांत राही नारायण सांगलीकर (वय ५६, रा. देहरादून, उत्तराखंड) आणि विजय नान तिरकी (वय ३२, रा. कानकेर, छत्तीसगड) यांना दिलासा मिळाला आहे. राज्य शासनातर्फे सहाय्यक महाधिवक्ता एस. व्ही. राजू यांनी बाजू मांडली.

Nagpur News
Loksabha Election : कोल्हापूरचा ग्राउंड रिपोर्ट थेट दिल्लीतून; प्रशांत किशोर-चाणक्य संस्थेकडून सर्व्हे, कोण मारणार बाजी?

काय आहे प्रकरण?

माओवादी समर्थक असल्याचा ठपका ठेवत ऑगस्ट २०१३ मध्ये गडचिरोली पोलिसांनी दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठाचा विद्यार्थी हेम मिश्रा याला अहेरी येथून महेश तिर्की आणि पांडू नरोटे यांच्यासह अटक केली होती. हेम मिश्राची चौकशी केल्यानंतर पत्रकार प्रशांत राही यालाही पोलिसांनी सप्टेंबर २०१३ मध्ये अटक केली होती. (Latest Marathi News)

माओवादी नेते गणपती, नर्मदा अक्का आणि प्रा. साईबाबा यांच्यात मध्यस्थी केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यामुळे २३ सप्टेंबर २०२५ रोजी प्रा. साईबाबांनीही पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. प्रा. साईबाबासह त्यांच्या या पाच सहकाऱ्यांना गडचिरोली सत्र न्यायालयाने ७ मार्च २०१७ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

Nagpur News
Suryakumar Yadav : IPL 2024 पूर्वी मुंबईला मोठा धक्का! सूर्याला लागले 'ग्रहण', इतक्या सामन्यांतून गेला बाहेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com