esakal | बल्ले बल्ले! नागपूर रॉक्स, स्वच्छता सर्वेक्षणात देशातून अठरावा नंबर
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur-3-710x480.jpg

नागपूरला स्वच्छ भारत सर्वेक्षणात १८ वा क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल महापौर संदीप जोशी यांनी नागपूर मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागासह मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागपूर शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती.

बल्ले बल्ले! नागपूर रॉक्स, स्वच्छता सर्वेक्षणात देशातून अठरावा नंबर

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : गाडीवाला आया घरसे कचरा निकाल, हे गाणे कानावर पडले कितीही कामात असलेला नागपुरकर घरातील कचरा गाडीत टाकतो. आणि नागपूर स्वच्छ ठेवण्यात हातभार लावतो. परिणामी नागपूर आता स्वच्छ शहर म्हणून गणले जाऊ लागले आहे. केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत जानेवारी महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात नागपूर शहराने देशातून अठरावा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी नागपूर ५८ व्या क्रमांकावर होते. वर्षभराच्या प्रयत्नाने या वर्षी रँकिंगमध्ये नागपूर शहराने मोठी भरारी घेतली आहे.

गृह निर्माण आणि शहर विकास मंत्रालयाद्वारे घोषित केलेल्या निकालानुसार महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये नागपूर पाचव्या क्रमांकावर आहे. नागपूरल या स्पर्धेमध्ये ४ हजार ३४५ गुण प्राप्त झाले आहेत. नागपूर शहराला सर्व्हिस लेवल प्रोग्रेस मध्ये १५०० पैकी १२०८, सर्टिफिकेशनमध्ये १५०० पैकी ५००, प्रत्यक्ष निरीक्षणमध्ये १५०० पैकी १३५४ आणि नागरिकांचे प्रतिसाद श्रेणीमध्ये १५०० पैकी १२८३ गुण मिळाले आहे. नागपूरला मागील वर्षी ६३.२२ टक्के गुण होते. यावर्षी ७२.४ टक्के गुण प्राप्त झाले आहेत.

सविस्तर वाचा - निसर्गाची मुक्त उधळण असलेले हे स्थळ नेमके आहे तरी कोणते?

नागपूरला स्वच्छ भारत सर्वेक्षणात १८ वा क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल महापौर संदीप जोशी यांनी नागपूर मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागासह मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागपूर शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती. या सर्वांचे महापौरांनी अभिनंदन केले. स्वच्छतेसाठी "मम्मी पापा यू टू" मोहीम हाती घेण्यात आली होती. या अभियानात तीन लाख शालेय विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यावर्षी सुध्दा मनपाच्या टीमने चांगले कार्य करून नागपूरचे रँकिंग पुढे नेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी देखील मनपाच्या टीमचे अभिनंदन करून नागपूरचे रँकिंग अधिक चांगले होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top