

Nitesh Karale
Esakal
राज्यात विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरलेल्या नितेश कराळे मास्तरांनी गुलाल आपलाच असं म्हणत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. पहिल्या फेरीत आपल्याला ४० ते ४५ हजार मते मिळतील आणि दुसऱ्या फेरीत विजय होईल, असा दावा त्यांनी मतमोजणी सुरू होताच केलाय. या निवडणुकीचा निकाल अनपेक्षित आणि ऐतिहासिक असेल, असंही कराळे मास्तर म्हणाले.