

Nagpur Graduate MLC Result
Esakal
नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवला. अभिजीत वंजारी यांना पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांची मिळून एकूण ६७ हजार २३१ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे सुधाकर कोहळे यांना ६३ हजार ९६० मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले.