धान्याचे भाव कमी होण्याची शक्यता; कोरोनाच्या धास्तीने वर्दळ कमी

Nagpur Grain prices likely to fall Corona panic reduced hustle bustle
Nagpur Grain prices likely to fall Corona panic reduced hustle bustlesakal

नागपूर : कोरोना आणि ओमिक्रॉनच्या (Corona and Omicron) वाढत्या भीतीमुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी झाली. मालाला उठाव नसल्याने धान्य(Grains), साखर(sugar),तेलाचे (oil) भाव स्थिर आहेत. १५ जानेवारीपर्यंत बाजारात वर्दळ न वाढल्यास धान्यासह साखरेचे भाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विदर्भात धान पिकाच्या पेरणी क्षेत्रात घट झाली. त्यातच विविध रोगांचा प्रादूर्भावही झाला. यामुळे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या चार मुख्य धान उत्पादक जिल्ह्यांसह नागपूर जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत धानाचे पीक कमी आले. राईस मिलवर धानाचा उतारा कमी असल्याने यंदा तांदळाचे उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत कमीच होण्याची शक्यता आहे.

Nagpur Grain prices likely to fall Corona panic reduced hustle bustle
बेळगावात पासधारक विद्यार्थ्यांना बसमधून खाली उतरविले

पूर्व विदर्भात धानपीक मुख्य आहे. मात्र, यंदा पाऊस कमी पडला. ऐन रोवणीच्या काळातच पाऊस लांबल्याने रोवण्या खोळंबल्या. अनेकांचे पऱ्हे सुकले. याचा परिणाम धान उत्पादनावर झाला. खताच्या किमती वाढल्याने उत्पादनाचा हेक्टरी खर्च वाढला. पूर्वीच्या एकरी १८ हजारांच्या तुलनेत असलेला खर्च २६ हजारांवर गेला.

अवेळी आलेला पाऊस आणि वादळामुळे नारळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे खोबऱ्याचे दर कडाडल्याने साऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. केरळमध्ये परतीच्या पावसाचे दुष्परिणाम आणि वाढत्या इंधनामुळे खोबरे तेजीत आहे. कर्नाटकसह सर्वच राज्यातील तुरीच्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे यावर्षीच्या तुरीच्या हंगामाची सुरुवातच अडथळ्याची झालेली आहे. परिणामी, तूर डाळीचे दर सध्या स्थिरावले आहेत. सध्या तूर डाळ प्रतिकिलो ८० रुपये किलो आहे.

Nagpur Grain prices likely to fall Corona panic reduced hustle bustle
सुपरचे ‘हार्ट फेल’ झाल्याने गरिबांचे हृदय धोक्यात!

नवीन तूर येण्याची शक्यता लक्षात घेता भाव कमी झालेले आहेत. यावर्षी तुरीला हमीभाव आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना कसा तरी हमीभावाइतका मोबदला मिळतोय. देशभरातील नवी तूर पुढील महिन्यात बाजारात येण्यास सुरुवात होईल. राज्यातील बाजारात कर्नाटक आणि राज्यातील तूर आल्यानंतर हे भाव पडण्याची मोठी शक्यता असते. मात्र, यंदा अधिक पाऊस पडल्याने अद्याप तुरीची आवक झालेली नाही. तुरीच्या लागवड क्षेत्राच्या तुलनेत तुरीची मागणी सध्याच्या बाजारात अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com