नागपूर मनपाच्या 'आपली बस'वर अज्ञातांचा हल्ला; दगडफेक करत फोडल्या बसच्या काचा, सरकारविरोधात घोषणाबाजी...

Nagpur Halba Reservation Protest : नागपूरमध्ये सतनामीनगर आणि गंगाबाई घाट परिसरात हलबा युवकांनी साडेआठ वाजताच्या सुमारास ‘आपली बस’वर दगडफेक केली आहे. यात बसच्या काचा फुटल्या.
Nagpur Halba Reservation Protest

Nagpur Halba Reservation Protest

esakal

Updated on

हलबा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजाकडून करण्यात आलेले आंदोलन चिघळले असून गुरूवारी (ता.११) सायंकाळच्या सुमारास सतनामीनगर आणि गंगाबाई घाट परिसरात हलबा युवकांनी साडेआठ वाजताच्या सुमारास ‘आपली बस’वर दगडफेक केली. याप्रकाराने बसच्या काचा फुटल्या. बुधवारी समाजाच्या युवकांनी तीन ठिकाणी टायर जाळून निषेध व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com