
नागपूरमध्ये भीषण अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेण्याची वेळ पतीवर आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. महामार्गावर भीषण अपघात झाल्यानंतर रस्त्यावर मदतीसाठी कुणीही थांबलं नाही. शेवटी हतबल पतीने मृतदेह दुचाकीवर बांधून नेला. महामार्ग पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मेयो रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.