

Nagpur Accident
esakal
नागपूर : भरधाव ट्रेलरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नीसह त्यांच्या धाकट्या मुलाचा मृत्यू झाला, तर थोरला मुलगा गंभीर जखमी आहे. शनिवारी (ता. ३) रात्री ९ वाजताच्या सुमारास हिंगणा हद्दीत गवसी मानापूर शिवारात हा भीषण अपघात झाला. योगेश सुदाम नाईक (वय ३५), सुनिता योगेश नाईक (वय ३२) गुलशन ऊर्फ गोलू योगेश नाईक (वय ४) अशी मृतांची तर तन्मय योगेश नाईक (वय ६) असे जखमीचे नाव आहे.
नाईक कुटुंब मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कारंजा, लांजी येथील रहिवासी आहे. कामाच्या निमित्ताने नाईक कुटुंब नागपुरात आले. येथून बुटीबोरीच्या दिशेने जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रेलर हरियाणाचा आहे. चालक निष्काळजीपणे ट्रेलर दामटत होता. नाईक यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. यामुळे चौघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यांना गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर चालक ट्रेलर सोडून पळून गेला. माहिती मिळताच हिंगणा पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. चारही जखमींना तातडीने एम्स रुग्णालयात नेण्यात आले. पण, त्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता. तन्मयवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याचीही परिस्थिती नाजूक असल्याचे कळते. पोलिसांनी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. रात्रीची वेळ असल्याने अपघात नेमका कसा घडला, याबाबत स्पष्टता नसून पोलिस माहिती घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.