Nagpur: मद्यपींचा धुडगुस, दोन तरुणांचा तोल जाऊन मृत्यू; शासकीय रुग्णालयात तळीरामांसह ६५ जणांवर उपचार

आनंदाचा. उत्साहाचा सण असलेल्या होळी आणि धुळवडीच्या दिवशी दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याने २५ आणि २७ वर्षीय युवकांचा तोल जाऊन दोघांनाही जीव गमवावा लागला.
Nagpur
Nagpur Esakal

Holi 2 Boys Died after Drinking: आनंदाचा. उत्साहाचा सण असलेल्या होळी आणि धुळवडीच्या दिवशी दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याने २५ आणि २७ वर्षीय युवकांचा तोल जाऊन दोघांनाही जीव गमवावा लागला. तर काही रंगाने संसर्ग झालेले, हाणामारीत व किरकोळ अपघातात जखमी तसेच काही तळीराम अशा एकूण ६५ जणांवर मेडिकल व मेयोत उपचार करण्यात आले. यात ४ जखमी महिलांचा समावेश होता. तर खासगी रुग्णालयात सुमारे दीडशे जणांवर उपचार करण्यात आले.

होळीच्या दिवशी आनंदाच्या भरात व भान हरपून मद्यपान केल्याने अनेकांना रुग्णालयात धाव घ्यावी लागली. डोळ्यांत रंग जाण्यापासून ते जखम होणाऱ्या रुग्णांवर मेडिकल, मेयोच्या नेत्ररोग विभागात उपचार करण्यात आले. मेडिकलमध्ये अपघात विभागात होळीमुळे अपघात झालेले, भांडणे होऊन जखमी झालेले व मद्यपानामुळे अस्वस्थ झालेल्या ४० जणांवर उपचार करण्यात आले. यातील दोघे जण अपघातामध्ये गंभीर जखमी झाले होते. त्यांना मेडिकलमध्ये आणले, परंतु त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली. ४० रुग्णांमध्ये सध्या कोणी गंभीर नसल्याची माहिती पुढे आली आहे.

मेयो रुग्णालयातही रविवार रात्रीपासूनच होळीशी संबंधित रुग्णांवर उपचार करण्यात आले. रंगपंचमीच्या दिवशी मेयो आणि मेडिकलमधील अपघात विभागात तीनशेवर रुग्ण दाखल झाले यातील ६५ रुग्ण होळीशी संबंधित, हाणामारी, अपघात तसेच रंगामुळे त्वचा, डोळ्यांचे रुग्ण असल्याची माहिती पुढे आली.

Nagpur
IPL 2024: ऋतुराजच्या CSK ने मोडला मुंबई इंडियन्सचा विक्रम! गुजरातला दिला सर्वात मोठ्या पराभवाचा धक्का

मेडिकल

मृतावस्थेत पोचलेले - २

हाणामारीच्या घटनांमध्ये जखमी -८

रस्ते अपघातामध्ये जखमी -२५

रंगामुळे डोळ्यांना इजा झालेले -३

मेयो

हाणामारीच्या घटनांमध्ये जखमी - १५

रस्ते अपघातात जखमी- ०९

रंगामुळे डोळ्यांना इजा झालेले -३

दरवर्षी मोठ्या प्रमाणात असे रुग्ण येतात. खबरदारीचा उपाय म्हणून खाटा आरक्षित ठेवल्या जातात. वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या वाढविली जाते. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनुचित घटना घडतात.-डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधिक्षक, मेडिकल.

Nagpur
Lok Sabha Election 2024: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; पुन्हा कोणाला मिळाली संधी? पाहा 17 उमेदवारांची नावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com