हर्बल हुक्क्यासाठी राजरोसपणे मिळतो गुमास्ता

ओळखीच्या व्यक्तीला ‘टोबॅको फ्लेवर
Nagpur
Nagpursakal

नागपूर : शहरात धडाक्यात सुरू असलेल्या हुक्का पार्लरला कुठलीही तपासणी न करता गुमास्ता (दुकान चालविण्याचा परवाना) दिल्या जात आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. केवळ हर्बल हुक्का पार्लर असल्याचे सांगून गुमास्ता मिळाल्यानंतर टोबॅको फ्लेवरची सर्रास विक्री होत आहे.

पब आणि लाऊंजमध्ये एन्जॉय म्हणून धुव्व्याचा झुरका तोंडातून काढून त्यात रमलेली तरुणाई हुक्क्याच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. अनेक पबमध्ये केवळ हर्बल हुक्का असल्याचे सांगून त्या ऐवजी टोबॅकोची विक्री करतात. अनेक छाप्यांमध्ये ते आढळून आले आहे. याकरिता दुकाने व प्रतिष्ठाने विभागाकडून हुक्का पार्लरसाठी अधिकृत परवाना घेतला जातो. त्यामुळे शहरात आणि वर्धा, अमरावती मार्गावर असलेल्या काही हुक्का पार्लरच्या व्यवसायाची भरभराट झाल्याची बघायला मिळते.

सुरुवातीला अधिकृतरित्या व्यवसायास सुरू असल्याचे दाखवले जातो. त्यानंतर तरुणांना आकर्षित करण्यासाठी टोबॅकोचा वापर केला जातो.

पोलिसांना कारवाईत अडसर

अनेकदा हुक्का पार्लरवर छापा टाकल्यावर टोबॅको आढळून न आल्यास त्यांच्यावर गुमास्ताच्या नावावर कारवाई करून ते पार्लर बंद करता येणे शक्य होते. मात्र, आता त्या नावावरही गुमास्ता मिळत असल्याने कारवाई करायची कशी? हा प्रश्‍न आहे. दुसरीकडे डॉक्टरांच्या मते कुठलाही धूर शरिरात जाणे हे धोकादायक असल्याने हर्बल हुक्क्याला परवानगी देणे शक्य नसल्याचे सांगण्यात येते. असे असताना, त्यांना गुमास्ता देणे हे तितकेच घातक आहे.

अनेक हुक्का पार्लरमध्ये कारवाईदरम्यान अशाच प्रकाराचे गुमास्ते दाखविण्यात येतात. त्यातून कारवाईपासून वाचण्यासाठी प्रयत्न करतात. त्यातून अशा हुक्का पार्लरची संख्या वाढली आहे.

-किशोर पर्वते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, युनिट २ गुन्हे शाखा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com