HSRP Number Plate: नवी नंबरप्लेट नसणाऱ्या १७२० वाहनांना दंड ;१ हजार रुपये चालान, २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ लावणे बंधनकारक

Nagpur HSRP Number Plate: नागपुरात एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या १,७२० वाहनधारकांवर प्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान दंडात्मक कारवाई केली. तपासणी केलेल्या ३,१२७ वाहनांपैकी या वाहनांवर प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
RTO officials inspect vehicles in Nagpur during the HSRP number plate enforcement drive.

RTO officials inspect vehicles in Nagpur during the HSRP number plate enforcement drive.

esakal

Updated on: 

नागपूर: जुन्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’ (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी सरकारकडून गेल्या दीड वर्षात सात वेळा मुदतवाढ दिली. आता ही नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई केली जात आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान सात महिन्यात १ हजार ७२० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. एचएसआरपी नसणाऱ्या वाहन चालकांना प्रत्येकी १ हजार रुपये दंड लावला जात आहे. शहर आणि पूर्व प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत एचएसआरपी तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यात ३ हजार १२७ वाहने तपासण्यात आली. यात १ हजार ७२० वाहनांना एचएसआरपी नसल्याचे आढळले.

Loading content, please wait...