Minor Girl Attacked in Nagpur
Sakal
नागपूर : ‘तू मला खूप आवडते’ असे म्हणत लज्जास्पद वर्तन करून विनयभंग आणि वारंवार त्रास देणाऱ्या आरोपीची तक्रार पालकाकडे केल्यानंतर अल्पवयीन मुलीवर आरोपीने जीवघेणा हल्ला केला. हातोडी आणि चाकूने गळ्यावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना इमामवाडा पोलिस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. सूरज कृष्णप्रसाद शुक्ला (वय २६, रा. इमामवाडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.