नागपूर : इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानाला आग

लाखोंचे नुकसान ः दुकाने बंद असल्याने अनर्थ टळला
Nagpur Imitation jewelery shop fire deu to increasing temperature
Nagpur Imitation jewelery shop fire deu to increasing temperaturesakal

नागपूर : वाढत्या तापमानाने शहरात आगीच्या घटनांतही वाढ झाली. रविवारी सायंकाळी इतवारीतील एका इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानाला आग लागली. यात लाखो रुपयांच्या इमिटेशन ज्वेलरीसह इतर साहित्यही जळाले. रविवारी दुकान बंद असल्याने ग्राहक नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

इतवारीतील पोस्ट ऑफिससमोरील धारस्कर रोडवरील प्रियदर्शनी इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानाला सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आग लागली. दुकानातून धूर दिसताच परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाला कळविले. अग्निशमन विभागाच्या विविध केंद्रावरून चार अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले.

परंतु तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले. इमिटेशन ज्वेलरीसह मॅचिंग सेंटर असल्याने कापडही होते. त्यामुळे आगीने काही वेळातच संपूर्ण दुकान कवेत घेतले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी येथे पोहोचताच पाण्याचा मारा केला. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. परंतु यात लाखो रुपयांची इमिटेशन ज्वेलरी, पंखे, काचाचे शोकेस आदी जळाले. आज रविवार असल्याने या परिसरातील दुकाने बंद होती. त्यामुळे आग विझविण्यासाठी मोकळी जागा होती. रविवार असल्याने परिसरात काहीच गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com