नागपूर : प्रत्येक वीज बिलावर तिरंगा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम
Nagpur Indian flag on every electricity bill independence day activities
Nagpur Indian flag on every electricity bill independence day activities

नागपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. संपूर्ण देश ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत महावितरणही मागे नाही. महावितरणने ऑगस्ट महिन्यातील सर्व वीजबिलांवर ‘हर घर तिरंगा’चे स्टिकर्स चिकटवून प्रत्येक घरात तिरंगा पोहोचविला आहे.

जुलै अखेर राज्यात महावितरणचे एकूण २ कोटी ८८ लाख २८ हजाराहून अधिक ग्राहक आहेत. यामध्ये घरगुती २ कोटी १५ लाख ४३ हजार, वाणिज्यिक २० लाख ५६ हजार, औद्योगिक ३ लाख ९६ हजार, शेतीपंपाचे ४४ लाख २५ हजार व उर्वरित ग्राहकांचा समावेश आहे. प्रत्येकाच्या घरात वीजबिल संग्रही असतेच. याबाबतचे निर्देश केंद्राकडून मिळाले.

तोच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी तातडीने पावले उचलत सर्व वीजबिलांवर तिरंगा लावण्याचे ठरवले. अन् अवघ्या काही दिवसांत त्या-त्या भागातील ‘बिलिंग सायकल’नुसार प्रत्येकाच्या घरी तिरंगा पोहोचविण्याचे काम महावितरणने केले आहे. भविष्यात हे वीजबिल पाहून प्रत्येकाची अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाची आठवण नक्कीच ताजी होईल, असा विश्वास महावितरणला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com