नागपूर : रक्तदानातून ‘HIV’ बाधेच्या चौकशीसाठी समितीची स्थापना

आरोग्य विभागासह एफडीएच्या अधिकाऱ्यांचा समावेश
Nagpur investigation committee for HIV infection through blood donation
Nagpur investigation committee for HIV infection through blood donationSakal

नागपूर : एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारी रक्ताशी निगडित व्याधी म्हणून थॅलेसेमियाची गणना होते. या रुग्णांना मोफत रक्त देण्यात येते. नागपुरात ४ थॅलेसेमियाबाधित मुलांना रक्त दिल्यानंतर त्यांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे प्रकरण उजेडात आले. यातील एका मुलाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. समितीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागासह एफडीएच्या अधिकाऱ्यांचा चौकशी समितीत समावेश आहे.

नागपूरसह जवळपासच्या जिल्ह्यातील दहा वर्षांखालील चार सिकलसेलग्रस्त, थॅलेसेमिया मुलांना ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याचे पुढे आले. रक्ताशी संबंधित आजार असलेल्यांना दर पंधरा दिवसांत रक्त देताना दूषित रक्तामुळे ‘एचआयव्ही’ची बाधा झाल्याचा संशय मुलांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात गठित केलेल्या समितीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे विभागीय रक्त संक्रमण अधिकारी डॉ. राज वाघमारे यांच्यासह एफडीएतील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. समितीने पहिल्या टप्यांत गुरुवारी थॅलेसेमिया, सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी यांची भेट घेत या प्रकरणाची माहिती घेतली.

सार्वजनिक आरोग्य सेवा आणि अन्न व औषध प्रशासन (औषध) विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. चौकशीला सुरवात झाली आहे. लवकरात लवकर अहवाल सादर करण्यात यावा अशी सूचना चौकशी समितीला केली आहे.

- डॉ. रवी धकाते, सहाय्यक उपसंचालक (नागपूर विभाग)

थॅलेसेमिया तसेच सिकलसेल बाधितांना शासनाकडून मोफत रक्त मिळावे असा नियम आहे. मुलांना होल ब्लड दिले जाते. यामुळे इतर आजारांचा संसर्ग होतो. ‘नॅट’ तपासणी केलेले रक्त दिल्यास संक्रमनाचा धोका टळतो. यामुळे सिकलसेल, थॅलेसेमयाबाधिताना नॅट तपासणी केलेले रक्त मिळावे.

-डॉ. विंकी रुघवाणी, अध्यक्ष, थॅलेसेमिया, सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com