नागपूर म्हणजे भारताची ‘स्ट्रीट फूड राजधानी’; तर्री पोह्याची ओढ कायम

नागपूर म्हणजे भारताची ‘स्ट्रीट फूड राजधानी’; तर्री पोह्याची ओढ कायम
Picasa

नागपूर : पोह्यांनी भरलेली कढई.. चणे (हरभरा), टोमॅटो, उकळत्या तर्रीने भरलेला गंज अन् गरम गरम कच्चा कांदा (Onion) सर्व्ह करून बनविलेले पोहे खाण्यासाठी खाद्य प्रेमींची जमलेली गर्दी. हे चित्र नागपूरकरांसाठी (Nagpur) नवीन नाही. नागपूरच्या अशा विविध खाद्यांना सातासमुद्रापार पोहोचविण्यात नेटकऱ्यांचा मोठा हातभार आहे. यामुळेच भारताची ‘स्ट्रीट फूड राजधानी’ (Street Food Capital) म्हणून नागपूर शहर या नेटकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. (Nagpur is now the capital of street food)

इंस्टाग्राम, फेसबुक, मीम्स, रील्स, आयजीटीव्हीच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी नागपूरमधील खाद्य संस्कृती आज जगभरामध्ये पोहोचवली आहे. विशेषतः पोहे, चाट, सावजी सारख्या खाद्य पदार्थांवरील डिजिटल कंटेंट आजही व्हायरल होतो आहे. या ब्लॉगर्सच्या पोस्टवरील लाईक्स, त्यांचे फॉलोअर्स यावरून या पदार्थांची ओढ इतर प्रदेशातील किंवा राज्यातील व्यक्तींना असलेली पाहायला मिळते. त्यामुळे नागपूरमध्ये आल्यावर तर्री पोह्यांसह या पदार्थांची चव चाखायला हमखास बाहेर पडतो.

सोशल मीडियावरील विविध प्रकारच्या पोस्टमुळे अनेक फुटपाथवर विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनीही आपली ओळख निर्माण केली आहे. या फेरीवाल्यांकडील पदार्थांची विशेषत: खाद्य प्रेमींपर्यंत पोहोचविण्यात या नेटकऱ्यांचा मोठा हातभार आहे. प्रामुख्याने खाद्यावर प्रेम करणारे नेटकरी या प्रकारचा कंटेंट तयार करण्यात रस दाखवितात. डिजिटल कंटेंटची ‘भूक’ भागविण्यासाठी विविध फंड्यांचा नेटकऱ्यांकडून वापर होतो आहे.

नागपूरचे खाद्यपदार्थ देशामध्ये खूप प्रसिद्ध आहेत. देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून दर महिन्यामध्ये कंटेंट क्रिएटर नागपूरला भेट देतात. शहरातील फक्त तर्री पोहेच नाही तर फेरीवाल्यांकडील इतर अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ देशभरातील खाद्य प्रेमींसाठी जिव्हाळ्याचे आहेत. त्यामुळे, कंटेंट तयार करण्यासाठी देशभरातील नेटकरी प्राधान्याने नागपूरमध्ये येतात. मी ऑनलाइन पदार्थ मागवून त्यावर कंटेंट तयार करतो आहे.
- सुमेध कानडे, डिजिटल क्रिएटर, गौरमेट मुसाफिर
लॉकडाउनमुळे कंटेंट तयार करण्यासाठी मोठ्या अडचणी जाणवत आहेत. माझ्या सारख्या खाद्यप्रेमीला टपरीवरच्या खाद्याची असणारी ओढ मी माझ्या कंटेंटमध्ये प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न करतो आहे. पोह्यांवरील या पोस्टला काही दिवसात लाखो व्हू मिळाले. शिवाय, बाहेर मिळणारे पदार्थ घरच्या घरी तयार करीत पोस्ट तयार करतो आहे. व्हिडिओ पाहून तोंडाला पाणी सुटले, अशा कमेंटही लोक करतात.
- कार्तीक रामचंदानी, डिजिटल क्रिएटर (नागपूरचा कार्तिक)

(Nagpur is now the capital of street food)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com