

Bishnoi gang threatens eight traders in Itwari Sarafa Bazaar, Nagpur
Sakal
नागपूर : दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू असतानाच इतवारी सराफा बाजारातील आठ नामांकित व्यापाऱ्यांना कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने धमकीची पत्रे मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागपूर सराफा असोसिएशनने या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार केली. तसेच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनाही निवेदन दिले आहे.