Nagpur : ओव्हरटेक केले म्हणून जवानाची मारहाण Nagpur jawan beaten up overtaking arrest | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maramari

Nagpur : ओव्हरटेक केले म्हणून जवानाची मारहाण

नागपूर : कारला ओव्हरटेक केल्याने रागाच्या भारात भररस्त्यात महिलेला जबर मारहान करण्यात आली. ही घटना शुक्रवारी दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास इंदोरा येथील रुघवानी हॉस्पिटलजवळ उघडकीस आली आहे. याबाबत व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत, माजी बीएसएफ जवानाला अटक करण्यात आली आहे.

शिवशंकर श्रीवास्तव असे आरोपी बीएसएफ जवानाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी शिवशंकर श्रीवास्तव आपल्या कारने (एमएच- ४०सीएच०१३५) आणि महिला आपल्या मोपेडने (युपी९३, एव्ही८३१९) दोन वर्षीय मुलासोबत भीम चौकाकडून इंदोरा चौकामधून आईकडे कुशीनगर येथे जात होत्या.

दरम्यान शिवशंकर यांनी डाव्या बाजूने तर महिलेने उजव्या बाजुने टर्न घ्यायचे होते. त्यानुसार शिवशंकरने इंडिकेटर दिले. तेवढ्यात महिलेने मोपेडने (एमएच)कारला ओव्हरटेक केला. त्यावरून चौकात त्यांच्या बरोबरीने वाहन थांबविले. त्यामुळे महिलेने त्याला ‘दिखता नही क्या’ असे म्हटले. त्यातून त्याने शिविगाळ सुरू केली.

त्यामुळे महिलेने त्याच्या वाहनाचा क्रमांकाचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खाली उतरून त्याने शिविगाळ केली. त्यातून दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. त्याने महिलेच्या तोंडावर अनेक वार केले. त्याने तिचे केस धरून ओढले. हा प्रकार पाहून आजूबाजूच्या लोकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्याने महिलेला मारहाण सुरूच ठेवली. काहींनी हा प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला. तो थोड्याच वेळात समाज माध्यमांवर व्हायरल झाला.