esakal | Nagpur: जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात शुकशुकाट, पदाधिकारी प्रचारात
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : जिल्हा परिषद

नागपूर : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात शुकशुकाट, पदाधिकारी प्रचारात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच सत्ताधारी पदाधिकारी व विरोधक ग्रामीण भागात प्रचारात व्यस्त झाले आहे. पदाधिकारीच मुख्यालयात शुकशुकाट आहे. सभापती नाहीत, निवडणुकीनंतर या, असे उत्तर कर्मचाऱ्यांकडून काम घेऊन येणाऱ्या नागरिकांना कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहे.

ग्रामीण विकासाचा कणा म्हणून जिल्हा परिषदेची ओळख आहे. केंद्र व राज्य सरकारतर्फे ग्रामीण भागाच्या विकासाकरिता येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करणे व त्या योजनांवर देखरेख ठेवणे, ग्रामस्थांपर्यंत या योजना पोहोचविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. जिल्हा परिषदेवर सुमारे १८७२ गावांच्या विकासाची जबाबदारी आहे. शासनाच्या विविध योजना, अभियान, मोहीम आदी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येतात.

हेही वाचा: पुण्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार

त्यामुळे दररोज शेकडो ग्रामस्थ कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त जि.प. मुख्यालयात येतात. परंतु, जिल्ह्यात पोटनिवडणूक होत असल्यामुळे आचारसंहिता लागू आहे. तसेच पदाधिकारी व सदस्य निवडणुकीत व्यस्त आहे. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्यांना कुणालाही भेटता येत नसल्यामुळे मुख्यालयात होणारी गर्दी ओसरल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात आचारसंहिता लागू असल्यामुळे ज्या मतदारसंघात निवडणूक होत आहे तेथे आणि त्या सर्कलच्या आजूबाजूच्या मतदारसंघात कोणतेही विकास कामे अथवा मतदार प्रभावित होईल, अशा कोणत्याही घोषणा करता येत नाही. सध्या कार्यादेश झालेलेच कामे सुरू आहे. त्यामुळेही मुख्यालयात नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. परिणामी जिल्हा परिषद बांधकाम, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, कृषी, जलसंधारण, समाज कल्याण आदी विभागातही शांतता दिसून येत आहे.

loading image
go to top