Nagpur: मार्च महिन्यातच आटले जंगलातील पाणवठे, वन्यप्राणी गावाच्या आसऱ्‍याला ; कृत्रिम पाणवठ्यावर भागणार तहान

यावर्षी जंगलातील पाणवठे मार्च आणि एप्रिल महिन्यातच आटल्याने वन्यप्राणी आणि गावकरी यांच्या पाण्यासाठी संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Nagpur
Nagpur Esakal

Water Reservoir in Sanctuary: यावर्षी जंगलातील पाणवठे मार्च आणि एप्रिल महिन्यातच आटल्याने वन्यप्राणी आणि गावकरी यांच्या पाण्यासाठी संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन्यप्राण्यांसाठी पाणवठ्यात भरपूर पाणी ठेवण्याची मागणी जंगलाशेजारी राहणाऱ्या गावकऱ्यांनी केली आहे.

यंदा मार्च महिन्यातच सूर्य आग ओकू लागल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. अशातच आता एप्रिल महिन्यात उष्णतेचा पारा चाळीशीच्या पार गेला आहे. त्यामुळे उन्हाचा कडाका वाढला आहे. रामटेक तालुक्यात पेंच व्याघ्र प्रकल्पासह मोठ्याप्रमाणात जंगल व्याप्त परिसर असून त्यामधील नदी, नाले कोरडे पडले आहेत. जंगलातील पाण्याचे स्त्रोतही आटत आहेत. यामुळे मानवाबरोबरच वन्य प्राण्यांचीही पाण्यासाठी भटकंती होत आहे. वन्यजीव पाण्याच्या शोधात गावकुशीच्या आसऱ्याला येत आहेत.

त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण असून मानव आणि वन्यजीव संघर्षाची शक्यता बळावली आहे. यावर्षी मार्च महिन्यातच उन्हाच्या झळा सुरू झाल्या. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत असून याचा सर्वात जास्त फटका वन्यजीवांना बसत आहे. जंगलातील तलाव वगळता नैसर्गिक नदी, नाले, ओढे व पाणवठे आटून गेले आहेत. वनविभागाने प्राण्यांसाठी जंगलात कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. (Latest Marathi News)

परंतु, डिसेंबर, जानेवारीतच हे पाणवठे कोरडे पडत असल्यामुळे वन्यजीवांची तहान भागविण्यास कुचकामी ठरत असल्याचे चित्र बघावयास मिळते आहे. परिणामी तहानेने व्याकूळ झालेल्या वन्यजीवांना तहान भागविण्यासाठी तलावावर निर्भर राहावे लागत आहे. एप्रिल महिना सुरू झाला असून पाण्याची पातळी सातत्याने खाली जात आहे. त्यामुळे जंगलातील नैसर्गिक तलाव व इतर पाठवण्यात देखील पाणी शिल्लक राहिलेले नाही. अशा स्थितीत वन्यप्राणी गावाकडे कूच करीत आहे.

Nagpur
Archana Patil: महायुतीचा धारशिवचा उमेदवार अखेर ठरला! ओमराजे निंबाळकरांविरोधात लढणार अर्चना पाटील

पाण्याविना वन्यप्राण्यांचाही जीव कासावीस होत असल्याने पाण्याच्या शोधात दाहीदिशा अशी परिस्थिती ओढवली आहे. एप्रिल महिन्यातच भीषण पाणीटंचाई जाणवत असताना मे महिन्यात काय परिस्थिती राहील, याचा अंदाज या स्थितीवरून लक्षात येत आहे. तेव्हा वन्यप्राण्यांसाठी आता कृत्रिम पाणवठे निर्माण करण्याची गरज आहे. परंतु,उन्हाळ्याच्या काळात सरपण गोळा करण्यापासून तर मोहफुले व तेंदूपत्ता संकलनासाठी तलावानजीकच्या जंगलात लोकांचा दिवसभर मोठा वावर असतो. याच ठिकाणी हिंस्र प्राण्यांचाही संचार असल्याने तेंदूपत्ता संकलन करणाऱ्यांच्या जिवाला धोका संभवतो. (Latest Marathi News)

व्यवस्था करण्याची मागणी

सायंकाळी वाघ, बिबट, तलावाजवळ शिकारीसाठी दबा धरून बसतात. त्यामुळे तृणभक्षी पाण्याच्या शोधात गावात येत असल्याने गावकुसाबाहेर दबा धरून त्यांच्या मागावर असलेले वाघ, बिबटे रात्रीच्या वेळी गावात येतात. तर गोठ्यातील जनावरे ठार करीत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वनविभागाने जंगलातील पाणवठ्यात उन्हाळाभर पाणी राहील, अशी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Nagpur
Rashmi Barve: रश्मी बर्वे यांना मोठा दिलासा! जात पडताळणी समितीच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com