Nagpur News : वाहनांवर आकारले जाणार प्रवेश शुल्क

कळमना बाजार समितीचा निर्णय ः १ ऑगस्टपासून अंमलबजावणी
nagpur kalmana bazar committee
nagpur kalmana bazar committee sakal

Nagpur Bajar Samiti : कळमना कृषी उत्पन्न बाजा समितीच्या आवारात शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रवेश आणि पार्किंग शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून केली जाणार आहे. समितीने एका खासगी कंत्राटदाराला हे कंत्राट दिले आहे.

शेतमाल आणणाऱ्या वाहनावर दहा रुपये शुल्क आकारले जाणार आहे. अन्यथा प्रवेश नाकारला जाणार आहे. बाजार समितीने याची माहिती देण्यासाठी एक परिपत्रक काढले असून ते सर्व व्यापारी, नोकरदार, शेतकऱ्यांना पाठविण्यात आलेले आहे. पत्रानुसार पंडित जवाहरलाल नेहरू यार्डच्या आवारात १ ऑगस्टपासून शेतमाल आणणाऱ्या वाहनांवर शुल्क आकारण्याचा निर्णय संचालकांनी घेतला आहे.

त्यात आठ तासांसाठी मोठ्या वाहनांकडून दहा रुपये आणि लहान वाहनांकडून पाच रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच मोठ्या वाहनांना एका महिन्याचा पास ५०० तर लहान वाहनांना ३०० रुपयांमध्ये देण्यात येणार आहे.

nagpur kalmana bazar committee
Nagpur News : भिडे यांच्यावर कारवाई करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ः भाजपशी त्यांचा संबंध नाही

व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

बाजार समितीच्या या निर्णयाचा शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. परतू, अद्यापही कोणतीही संघटना याला विरोध करण्यासाठी पुढे आलेली नसली तरी उद्या सोमवारी त्याला विरोध केला जाणार असल्याची माहिती आहे.

शुल्क बुचकाळ्यात टाकणारे

बाजार समितीने काढलेले परिपत्रक आश्चर्यकारक आहे. कारण दररोजचे प्रवेश दर आणि मासिक शुल्काच्या दरात मोठा घोळ दिसत आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, मोठ्या वाहनांसाठी एक दिवसाचे प्रवेश शुल्क १० रुपये आणि एका महिन्यासाठी ५०० रुपये आणि

लहान वाहनांसाठी प्रवेश शुल्क पाच रुपये प्रतिदिन आणि ३०० रुपये प्रति महिना आहे. प्रतिदिन दहा रुपयाप्रमाणे ३०० रुपये तर पाच रुपये प्रति महिना १५० रुपये होतात. हे शुल्क व्यापाऱ्यांनाच नव्हे तर सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे आहे.

nagpur kalmana bazar committee
Nagpur News : कर्जवाटपात बँकांच्या जाचक अटींचा खोडा; अर्धे कर्ज सावकारांनीच वाटले

शेतकऱ्यांवर बोझा वाढणार

बाजार समितीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या खिशावर बोजा पडणार आहे. सततच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना बाजार समितीचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरणार आहे. त्यामुळे शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी अधिक भाडे मोजावे लागणार आहे.

बाजार समितीच्या नियमावलीतच याचा उल्लेख आहे. मात्र याबाबत नवीन व्यवस्था लागू झाल्यानंतर बाजारात आतापर्यंत होणारी उपकर चोरी थांबणार आहे. बाजारात येणारी वाहने आणि शेतमालाची स्थिती कळणार आहे. हा माल कुठून आला आणि कोणाला विकला याचीही नोंद होणार आहे.

अहमद शेख, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

nagpur kalmana bazar committee
Nagpur: नागपूरच्या दोन व्यावसायिकांची कोंढाळीत गोळ्या झाडून हत्या; चार खुनांनी शहर हादरले

बाजार समितीच्या नियमावलीतच याचा उल्लेख आहे. मात्र याबाबत आम्ही शेतकऱ्यांकडून शुल्क आकारत नव्हतो. त्यामुळे बाजाराच्या परिसरात कोणता माल येतो आणि तो कोणत्या व्यापाऱ्यांकडे येतो ही माहिती प्राप्त होत नव्हती. त्यासाठी आता खासगी एजन्सीला कंत्राट दिले आहे. एजन्सीचे कर्मचारी प्रवेशद्वारावर प्रवेश करतील. त्यांना संगणक व इतर साहित्य समितीकडून देण्यात येणार आहे.

- नागनाथ येगळेवार, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com