नागपूर : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

बहिणीसमोरच तोडले लचके; काटोलमधील धक्कादायक घटना
Stray dog
Stray dogsakal

काटोल : शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या धंतोली भागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. कुत्र्यांनी बालकावर हल्ला करून त्याच्या शरीराचे लचके तोडले. ही धक्कादायक घटना आज, सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. विराज राजेंद्र जयवार (वय ५) हे बालकाचे नाव आहे.

विराज जयवार हा पाच वर्षीय मुलगा त्याच्या मोठ्या बहिणीसह घरासमोर फिरत असताना त्याच्यावर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. घाबरलेल्या विराजने धावून जात स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मोठी बहीण जिवाच्या आकांताने आरडाओरड करू लागली. मात्र, कुत्र्याने पाठलाग करत त्याला पकडले. पाहता पाहता दहा ते बारा भटक्या कुत्र्यांनी विराजवर हल्ला केला.

आणि काही अंतरापर्यंत त्याला ओढत नेले. जवळच एका निर्माण कार्यासाठी वाळू साठवलेली होती, कुत्र्यांनी त्याला त्या ठिकाणी ओढत नेऊन त्याचे लचके तोडले. वस्तीतील नागरिक विराजला वाचवण्यासाठी धावत, त्या ठिकाणी पोहोचले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या अंगावरील कपडे फाडले. डोक्याचा भाग, पोटाचा भाग कुत्र्याचे लचके तोडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जयवार परिवार पारडसिंगा येथील असून मुलांच्या शिक्षणाकरिता पत्नी व दोन मुले विराज, मुलगी देवांशु वय (१ वर्ष) सोबत चार जण धंतोली येथे राहत होते. पुतणी पारडसिंगा येथून आलेली होती. शनिवारला सकाळी परिवारातील सर्व मंडळी उठली. पुतणी व विराज धंतोली बगीचा येथे फिरायला जात असल्याचे सांगितले. आणि रस्त्यात काहीच अंतरावर अशी दुर्दैवी धक्कादायक घटना घडली. विराजचे वडील राजेंद्र मारोतराव जयवार (३८) यांनी काटोल पोलिसात तक्रार नोंदविली.

तक्रारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

मिळालेल्या माहितीप्रमाणे वस्तीतील नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळेला भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबद्दल नगरपरिषद तसेच स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली होती. डुकराचे पिल्लू, शेळीचे पिल्लू यांच्यावर हल्ला करत त्यांच्या जीव घेण्यापर्यंत कुत्र्यांची मजल गेली होती. तसेच गेले अनेक दिवस हे भटके कुत्रे नागरिकांवरही हल्ले करत होते. मात्र प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यामुळे आज विराजचा मृत्यू झाल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत जीवे मारले होते. अशा घटनांमध्ये वाढ होत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बालकाचा जीव गेल्यानंतर आता तरी प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

नागपूर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना

  • मे २०२२ - स्वावलंबीनगरात मुलीवर हल्ला, गंभीर जखमी

  • एप्रिल २००२ ः दीनदयालनगरात घरकाम करणाऱ्या महिलेला केले जखमी

  • मार्च २०२२ ः नंदनवन येथे

  • महिला जखमी

  • डिसेंबर २०२१ ः स्वावलंबीनगरात चिमुकलीला केले जखमी

  • जून २०२१ ः स्वावलंबीनगरात मुलाला केले जखमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com