Nagpur : वाईट मार्ग सोडा, शिक्षणाकडे वळा ; सत्यपाल महाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur news

Nagpur : वाईट मार्ग सोडा, शिक्षणाकडे वळा ; सत्यपाल महाराज

खापरखेडा : अनेक तरुण वाम मार्गाकडे वळले आहेत. वाईट मार्ग सोडा आणि शिक्षणाकडे वळा. शिक्षणाने माणूस मोठा होतो. शिक्षण हे वाघिनेचे दूध आहे. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांनी केले. ते भानेगाव येथे आयोजित समाजप्रबोधनपर कीर्तनाच्या कार्यक्रमातून बोलत होते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून रविवारी सायंकाळी भानेगाव पारशिवनी टी पाइंट परिसरात सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांच्या समाजप्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम झाला.

हेही वाचा: Nagpur : वैनगंगा नदीत स्कार्पिओ वाहन कोसळले

यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार आशीष जैस्वाल, किशोर चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार, माजी समाजकल्याण सभापती दीपक गेडाम, सोनबा मुसळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक झिंगरे, श्यामराव सरोदे, शुभम नवले, कल्याण अधिकारी अमरजित गोडबोले, अनेस चवरे, विजय देशमुख, माजी नगराध्यक्षा मायाताई चवरे, शालिनी चवरे, नेहा भोकरे, कपिल वानखेडे, केशव पानतावणे, राजेश खंडारे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा: Nagpur : भाजीपाल्‍याचे दर घटले

याप्रसंगी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, बुवाबाजीसारख्या संवेदनशील विषयाला हात घालून दारूपासून जिवन उद्धस्त करू नका. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अमलात आणा. तेव्हाच जीवनाचे सार्थक होईल. जात-पात पाळू नका. माणुसकीचा धर्म जपा. आपले गाव आदर्श कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करा असे आवाहन सत्यपाल महाराज यांनी केले. माय-माऊलींना सावित्रीबाई फुले यांच्यासारखे जगा. शिका, शिक्षित व्हा, संघटित व्हा असे उपस्थित महिलांना उपदेशून सत्यपाल महाराजांनी सांगितले. याप्रसंगी केंद्रीय लोकसेवा आयोग अभ्यासक्रमाची तयारी करणाऱ्या वृषाली गोस्वामी हिचा सत्यपाल महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हेही वाचा: Nagpur : मोकाट कुत्र्यांना आवरा हो...!

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना वंदन करून करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अनेस चवरे, अमोल कळंबे, राज तांडेकर, अभय घुगल, अरविंद चिकनकर, कृष्णा बर्वे, सचिन नागरकर, नरेश कनोजे, सुभाष चांदसरोदे, विजय गौरकर, पंकज चुकांबे, अरविंद तांडेकर, जितेश देशभ्रतार, सुमेध चव्हाण, मुकेश बागड़े, प्रशांत पाटिल, मिलिंद कुंभलकर, बबन बर्वे, योगेश जालंदर, मनीष कुंभलकर, दिलीप बर्वे, गुणवंत टापरे, अभि मनगटे, सोनू बागडे, पंकज मडावी, रूपेश पांडे, संघा पाटील, विलास शिंदूरकर, लोहित चिकनकर, मयूर गभने, गौतम भीमगड़े, राहुल जाटव, विक्की मालाधारी आदींनी प्रयत्न केले.