Nagpur : भाजीपाल्‍याचे दर घटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vegetables

Nagpur : भाजीपाल्‍याचे दर घटले

नागपूर : भाज्यांची आवक वाढल्याने दरात गेल्या दोन आठवड्यापासून घसरण होऊ लागली आहे. सर्वच भाज्यांचे दर आता प्रतिकिलो ५० ते ६० रुपयांवर आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा: Nagpur : जी- २० ची बैठक मार्चमध्ये!

महात्मा फुले भाजी बाजारात सध्या ७० ते ८० गाड्यांची आवक सुरू झालेली आहे. आवक वाढल्याने भाववाढीवर नियंत्रण आले आहे. हळू-हळू भाज्यांचे दर कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. पावसाने काढता पाय घेतल्यावर थंडी सुरू झालेली आहे. त्यानंतर दर्जेदार भाज्यांची आवक वाढणार असल्याने भाव घसरणे सुरू होणार आहे. येत्या काही दिवसात भाज्यांचे भाव घसरू लागतील, असे ठोक भाजीविक्रेते राम महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा: Nagpur : मोकाट कुत्र्यांना आवरा हो...!

वांगे - २५, फुलकोबी - २०

पानकोबी -२० ,टोमॅटो -२५

मेथी - ७० ,कोथिंबीर - ८०

शिमला मिरची- ५० ,मुळा - २०

हिरवी मिरची -४५, भेंडी - २०

पालक - २० ,तोंडले - २०

कोहळे -२० ,दुधी भोपळा -१०

काकडी - २० ,ढेमस - ४०

कारले - ४० ,दोडके - ४०

चवळी शेंगा - ३०