Nagpur : मोकाट कुत्र्यांना आवरा हो...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur news

Nagpur : मोकाट कुत्र्यांना आवरा हो...!

नागपूर : गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे कुत्र्यांची नसबंदी करण्यात न आल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या एक लाखांवर गेली आहे. त्यामुळे प्रत्येक गल्लीत कुत्र्यांचे झुंड दिसून येत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला कुणीही सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. शनिवारी सायंकाळी जयवंतनगरात साडेतीन वर्षीय मुलीला मोकाट कुत्र्याने चावा घेतला. दररोज प्रत्येक गल्लीत कुत्र्यांकडून धोका निर्माण झाला असून श्‍वानप्रेमींसोबतच आता महापालिकेविरोधातही संताप व्यक्त केला जात आहे. शनिवारी सायंकाळी ओंकारनगराजवळील जयवंतनगरात घराच्या मोकाट कुत्र्यांना आवरा हो...!

हेही वाचा: Nagpur Railway station : कुत्रे आणि प्रवासी एकाच प्रतीक्षालयात

गेटजवळ साडेतीन वर्षांची चिमुकली खेळत होती. अचानक मोकाट कुत्र्यांच्या कळपातील एकाने तिला चावा घेतला. दुसरा कुत्राही तिच्या दिशेने येण्यापूर्वीच कुटुंबियांचे लक्ष गेल्याने मोठा अनर्थ टळला. या चिमुकलीला लगेच डॉक्टरकडे नेण्यात आले. अशा घटना दररोज प्रत्येक वस्ती, गल्लीत घडत आहेत. यापूर्वीही स्वावलंबीनगरात एका महिलेवर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला करून जखमी केले होते. याच परिसरात एका चिमुकलीलाही कुत्र्यांनी जखमी केले होते. त्यामुळे आता मोकाट कुत्र्यांना आवारा हो, अशी हाक प्रत्येक गल्लीतील नागरिक देत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कुत्र्यांवर कारवाई शक्य नसल्याने महापालिकाही कारवाई करण्याबाबत पुढाकार घेत नाही.

हेही वाचा: Nagpur : जी- २० ची बैठक मार्चमध्ये!

महापालिकेची लाचारी व माणसांच्या जीवापेक्षा कुत्र्यांवर प्रेम करणाऱ्या पशुप्रेमीमुळे आता शहरातील नागरिक कुत्र्यांचे बळी ठरत आहेत. एखाद्याचा जीव गेला तरी कुत्र्यांवर कारवाई केली जात नसल्याने माणसांचा जीव स्वस्त झाल्याचे चित्र असून आता श्वानांसह श्वानप्रेमींविरोधातही संतापाची लाट उसळल्यास आश्चर्य वाटू नये, अशी स्थिती झाली आहे. एवढेच नव्हे अनेकदा वाहनधारकांच्या मागे कुत्रे धावतात. त्यामुळे किरकोळ अपघात नित्याची बाब झाली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांत कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया झाली नाही. त्यामुळे त्यांची संख्या ८१ हजारांवरून दीड लाखांवर गेली आहे. त्यामुळे त्यांचा उपद्रव वाढला असून नागरिक, चिमुकल्यांचे फिरणे कठीण झाले आहे. कुत्र्यांच्या दहशतीने अनेकांना आपला रस्ता बदलावा लागत आहे. महापालिकेने कुत्र्यांबाबत गंभीर होण्याची गरज व्यक्त केली जात असून अऩेकांनी तर श्वानप्रेमींवरही ताशेरे ओढले आहे.

हेही वाचा: Nagpur : काँग्रेसचा भाजपला जोरदार धक्का

प्रत्येक प्रभागात ३ हजार मोकाट कुत्रे

गेल्या दोन वर्षांत नसबंदी बंद असल्याने ८२ हजार कुत्र्यांची संख्या दीड लाखापर्यंत गेली आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागात सरासरी ३ हजार ५४७ मोकाट कुत्री आहेत. महापालिकेने पाच वर्षांपूर्वी त्यांच्या संख्येबाबत एक सर्वेक्षण केले होते. त्यानुसार सर्वाधिक साडेसहा हजार श्‍वान प्रभाग २१ मध्ये आहेत. आता त्यांची संख्याही आठ ते नऊ हजारावर गेली असावी, असा अंदाज आहे.

हेही वाचा: Nagpur : शेतकऱ्यांना त्रास दिला तर याद राखा !

कुत्र्यांनी जखमी केलेले नागरिक

वर्ष जखमी

२०१९-२० ५ हजार ७०१

२०२०-२१ १ हजार १६३

२०२१-२२ २ हजार १०९