

Nagpur Liquor Smuggling
esakal
नागपूर : ट्रकमध्ये वरून भंगार आणि खाली दारू ठेवून ‘पुष्पा स्टाइल’ मद्याची तस्करी करणाऱ्या चालकाला गुन्हेशाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दारुसाठ्यासह एकूण २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी अमरावती मार्गावरील आठवा मैल येथील आठवडी बाजाराजवळ करण्यात आली.
अब्दुल तौसिफ अब्दुल हफीज (वय ३४, रा. गवळीपुरा, आझादनगर, गिट्टीखदान) असे अटकेतील चालकाचे नाव आहे. गुन्हेशाखेचे पथक पोलिस निरीक्षक दिलीप चंदन यांच्या नेतृत्वात गस्तीवर असताना पोलिस हवालदार अजय शुक्ला यांना मिळालेल्या माहितीवरून आठवा मैल परिसरात सापळा रचण्यात आला.
एमएच ४० - सीडी १५९१ क्रमांकाचा ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यात प्लॅस्टिकचे भंगार होते. भंगाराखाली ३९० खोक्यांमध्ये दारूच्या बाटल्या असल्याचे आढळून आले. प्रत्येक खोक्यात ९० मिलीच्या १०० बाटल्या होत्या.
सर्व बाटल्यांमध्ये बनावट दारू चौकशीत हा साठा अंकुश ऊर्फ अन्ना सुधाकर कुंचनवार (३८, रा. यशवंतनगर, हिंगणघाट, वर्धा) याच्या सांगण्यावरून धुळे येथून आणल्याचे चालकाने सांगितले.
हा साठा आलापल्ली, गडचिरोली येथे नेण्यात येणार होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्राथमिक तपासणीत दारू बनावट असल्याचे आढळले. वाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अंकुश कुंचनवारचा शोध सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.