Nagpur Street Food Hygiene : खाद्यपदार्थ गरम; स्वच्छता मात्र ‘थंड’!रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांकडून नियमांची पायमल्ली; अन्न वाढण्याच्या हातानेच पैशांची देवाणघेवाण

Street Food Hygiene Raises Concerns in Nagpur : नागपुरातील सीताबर्डी, धरमपेठ, महाल-मोमिनपुरा आणि व्हीएनआयटी परिसरातील स्ट्रीट फूड स्टॉलवर स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहणीत आढळले.
Nagpur Street Food Hygiene

Nagpur Street Food Hygiene

esakal

Updated on

नागपूर : सायंकाळ होताच शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गर्दी होऊ लागते. मात्र, या चटपटीत खाद्यपदार्थांच्या मागे स्वच्छतेचा पुरता अभाव असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत दिसून आले. उघड्यावरच पदार्थ शिजवले जातात. अन्न वाढण्याच्या हातानेच पैशांची देवाण-घेवाण सुरू असल्याचे दिसून आले.

सीताबर्डी, धरमपेठ, महाल-मोमिनपुरा, व्हीएनआयटी परिसरातील खाद्यपदार्थाचे ठेले असलेल्या भागात फेरफटका मारला असता अनेक ठिकाणी स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसले.

हातमोजे, कॅपचा अभाव

फूड स्टॉलवर अन्न हाताळणारी व्यक्ती मळकट कापडानेच हात पुसत असल्याचे दिसले. बहुतेक फूड स्टॉलवर अन्न हाताळताना हातमोजे किंवा हेअर कॅपचा वापर होत नसल्याचेही दिसले. पाणीपुरीच्या काही ठेल्यांवर तर स्वच्छतेची स्थिती आणखी चिंताजनक दिसली.

वापरलेले तेल पुन्हा डब्यात

मंच्युरियन, समोसे, चिकन फ्राय यासारखे पदार्थ तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा वापरण्यासाठी डब्यात साठवले जाते. सर्वच विक्रेते उरलेल्या तेलात पुन्हा नवीन तेल मिसळून त्याचा वारंवार वापर करीत असल्याचे विक्रेत्यांनीच नाव न सांगण्याच्या अटीवर मान्य केले. काही ठिकाणी पदार्थ तळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कढईची एक बाजू स्वच्छ, पण खालच्या बाजूला तेलाचे थर साचल्याचे दिसले.

Nagpur Street Food Hygiene
Pune News: पुणेकरांना गुंठेवारीत दिलासा नाही! मुदतवाढ मिळाली, पण शुल्कात कपात नाही; जुन्याच दराने नियमितीकरण

भांडी धुण्याची जागा गटारापेक्षाही अस्वच्छ

अल्पोपाहार घेतल्यानंतर हात धुण्यासाठी ग्राहकांना रस्त्याच्या कडेलाच आसरा घ्यावा लागतो. खाद्यपदार्थ वाढले जातात, ती भांडी धुण्यासाठी काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला अत्यंत अस्वच्छ जागेचा आणि अस्वच्छ घमेल्यांचा वापर केला जातो.

कचरा एकत्र; रात्री रस्त्यावर

खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर निर्माण होणारा कचरा एकाच ठिकाणी जमा केला जातो. रात्री तो रस्त्याच्या कडेला टाकून दिला जात असल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण होते.

Nagpur Street Food Hygiene
Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

कारवाईच्या नावावर सूचनापत्र

कारवाईची जबाबदारी असलेल्या अन्न औषध विभागाने एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात ७१६ ठिकाणी स्ट्रीट फूड रेस्टॉरंटची तपासणी केली. यात ४२२ ठिकणी स्वच्छतेसंदर्भात त्रुटी आढळल्याने संबंधितांना सुधारणा करण्याची नोटीस बजावण्यात आली, तर ३८ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले. केवळ २ प्रकरणांत परवाने रद्द करण्यात आले.

तपासणीचे उद्दिष्ट दुप्पट

अन्न औषधी प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० ठिकाणी नियमित तपासणीचे उद्दिष्ट होते. ते आता दुप्पट करण्यात आले आहे. संशय असलेल्या ठिकाणचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. स्वच्छतेसंदर्भात त्रुटी आढळल्यास संबंधितांना सूचना दिली जाते. त्यानंतर पुन्हा तपासणी होते, मात्र शहरातील प्रत्येक विक्रेत्याची तपासणी शक्य नसल्याचे अन्न औषधी विभागाचे सहआयुक्त कृष्णा जयपूरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com