

Worker arrested in Nagpur with two live detonators and stolen phones.
Sakal
नागपूर : वरोरा येथील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोलि) या कोल माईन्समध्ये कंत्राटदारामार्फत मजुरीचे काम करणाऱ्याने दोन जिवंत डेटोनेटर आणि चोरीचे तीन मोबाइल घेऊन नागपुरात आल्याचा गंभीर प्रकार मंगळवारी (ता.१) दुपारच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी आजमशहा चौकात चोरीचे मोबाईल विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या मजूराला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याजवळ दोन जिवंत डेटोनेटर मिळाल्याने पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली.