हिवाळी अधिवेशन रद्द झाल्याने हजारोंचा रोजगार हिरावला , अडीचशे कोटींची उलाढाल ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur local poor people facing problems due to cancellation of winter assembly session

कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कोरोनामुळे आधीच रोजगार गेला. अधिवेशनाच्या निमित्ताने उलाढाल वाढेल, काम मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, अधिवेशन रद्द झाल्याने सर्वांची निराशा झाली.

हिवाळी अधिवेशन रद्द झाल्याने हजारोंचा रोजगार हिरावला , अडीचशे कोटींची उलाढाल ठप्प

नागपूर : हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूर आणि विदर्भात होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल अधिवेशन रद्द झाल्याने ठप्प झाली. लॉकडाऊन काळात अनेकांचा रोजगार गेला. आता अधिवेशन काळामध्ये काहीतरी कामधंदा करून उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल, असे वाटले होते. मात्र, अधिवेशन मुंबईत असल्याने सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. तरीही अधिकारी मात्र या निर्णयाने खूश आहेत. 

कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कोरोनामुळे आधीच रोजगार गेला. अधिवेशनाच्या निमित्ताने उलाढाल वाढेल, काम मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, अधिवेशन रद्द झाल्याने सर्वांची निराशा झाली. अधिवेशनासाठी ५० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. आमदार निवास, मंत्र्यांचे निवासस्थान रविभवनासह डागडुगी आणि रंगरंगोटी करण्यात येणार होती. या कामाच्या निविदासुद्धा झाल्या होत्या. फक्त कार्यादेश देण्याचे बाकी होते. त्यामुळे रंगरंगोटी करणाऱ्या छोट्या-मोठ्या कंत्राटदारांची अडचण झाली आहे. 

हेही वाचा - हॉटेल, लॉज मालकांनो रेकॉर्ड अपडेट ठेवा; अन्यथा होणार...

हिवाळी अधिवेशनासाठी हजारो कर्मचारी व मोर्चासाठी लाखो नागरिका १५ दिवसांच्या कार्यकाळात येतात. अधिकाऱ्यांसाठी गाड्यांची व्यवस्था केली जाते. रविभवन व आमदार निवासात रोजंदारीने कामगार नेले जातात. या पंधरवड्यात शहरातील खानावळी हाऊसफुल्ल असतात. बर्डी, महाराजबाग परिसरातील खानावळींमध्ये सायंकाळनंतर बसायला जागा मिळत नाही. अधिकारी व मंत्री हॉटेलमध्ये वास्तव्याला असतात. त्यामुळे हॉटेलचालकांसाठी हा सुगीचा काळ असतो. वेळेवर दुप्पट भाडे देण्याची तयारी असतानाही खोली मिळत नाही. 

हेही वाचा -महाविकास आघाडीत बिघाडी; काँग्रेसने उमेदवार दिल्यावरही...

शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी ताडोबा, पेंच, नागझिरा, सिल्लारी येथे पर्यटनासाठी अधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जातात. नागपूर सोडताना मंत्री, आमदार, नेत्यांकडून खास ऑरेंज बर्फीचा मागणी केली जाते. अधिवेशनाच्या शेवटी लाखो रुपयांच्या मिठाईची विक्री होते. ही सर्व उलाढाल सुमारे अडीचशे कोटींच्या आसपास असते. अधिवेशनाच्या निमित्ताने शहरात व बाजारपेठांमध्ये चैतन्य असते. मात्र अधिवेशन रद्द झाल्याने आधीच कोरोनामुळे अडचणीत असलेले व्यावसायिक आणखी अडचणीत येणार आहेत. 
 

loading image
go to top