नागपूर : लोणार सरोवर दुरवस्था; तक्रार आल्यानंतर न्यायमूर्ती करणार पाहणी

बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराची पाहणी
Nagpur Lonar lake
Nagpur Lonar lake

नागपूर : बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गोविंद सानप शनिवारी प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. सरोवर परिसरातील दुरवस्थेची तक्रार न्यायालयीन मित्रांनी न्यायालयाला केल्यानंतर याची दखल घेत न्यायमूर्तींनी स्वत: पाहणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, शनिवारची तारीख निश्‍चित करण्यात आली आहे.

नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार या भेटी दरम्यान विभागीय आयुक्त, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी, वन खात्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक, पुरातत्त्व खात्याच्या प्रतिनिधींसह इतर प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. न्यायालयीन मित्र ॲड. एस. एस. सन्याल यांनी लोणार सरोवर परिसराची नुकतीच पाहणी केली होती.

सांडपाणी प्रक्रीया व झोपडपट्टीच्या समस्येवर प्रशासनाने कुठलेही पाऊल उचलले नसल्यामुळे सरोवर परिसराची होणारी दुरवस्था त्यांनी लक्षात घेतली होती. तसेच, याबाबत न्यायालयाला अवगत केले होते. न्यायालयीन मित्र अ‍ॅड. एस. एस. सन्यालसुद्धा यावेळी उपस्थित राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com