Nagpur Longest Flyover
esakal
नागपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूरकरांना राज्यातील सर्वात लांब उड्डाणपुलाची मोठी भेट मिळणार (Nagpur Longest Flyover) आहे. उत्तर आणि दक्षिण नागपूरला जोडणाऱ्या तब्बल ८.९ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे आज (१९ सप्टेंबर) उद्घाटन होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. सुमारे ९९८ कोटी रुपये खर्चून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आला आहे.