नागपूर : शिवसेनेला भीती ‘गेम’ होण्याची

आघाडीच्या चर्चेची कोंडी कोण फोडणार?
Nagpur Mahavikas Aghadi Shiv Sena Congress
Nagpur Mahavikas Aghadi Shiv Sena Congresssakal

नागपूर : महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी नागपूरमध्ये महाविकास आघाडीबाबत चर्चा कोणासोबत करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे दोन्ही काँग्रेस आपला गेम करतील या भीतीने शिवसेनासुद्धा या संदर्भात पुढाकार घेत नसल्याचे समजते.

शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचा सतीश चुतर्वेदी यांच्यासोबत सुरवातीपासूनच छत्तीसचा आकडा आहे. हे दोघे एकमेकांसमोर येणेही टाळतात. दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत. त्यातच विस्तार करताना काँग्रेसच्या त्यांनी काही काँग्रेसचेच कार्यकर्ते पळविले आहेत. यावरून काँग्रेसमध्ये नाराजी आहे.

शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत. त्यात किशोर कुमेरिया महानगर प्रमुख आहेत. त्यांना दुष्यंत चतुर्वेदी यांच्याविषयी फार जिव्हाळा नाही. अलीकडेच कुमेरिया यांच्याकडून दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी काढून घेतली आहे. हे दुष्यंत चतुर्वेदी यांच्याच सांगण्यावरून झाल्याचा आरोप कुमेरिया समर्थकांचा आहे. हा वाद मुंबईपर्यंत पोहचवण्यात आला आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी हे फेरबदल केल्याने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच दरबारात या यावर निर्णय होणार आहे.

दुसरे महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे यांनी चतुर्वेदी म्हणतील ती पूर्व दिशा असे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे आघाडीबाबत बोलणी करायला शिवसेनेतून अद्याप कोणीच पुढाकार घेतला नाही. विकास ठाकरे चतुर्वेदी यांच्याकडे जाणार नाही हे निश्चित आहे. दुष्यंत चतुर्वेदी हे बंगल्याच्या बाहेर पडत नाही. दुसऱ्या कुठल्याच पदाधिकाऱ्याला बोलणी करण्याचा अधिकार नाही त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना सांगून ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राऊत यांची आणखी एक फेरी नागपूरला होणार आहे. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भेटून कोंडी फोडतील अशी आशा शिवसैनिकांना आहे. असे असले तरी शिवसैनिकांना प्रत्यक्ष निवडणुकीत काँग्रेसजन मदत करतील का हा प्रश्न सतावत आहे. याचे उत्तर सध्यातरी नाही हेच आहे. तशी भीती शिवसेनेच्या नेत्यांनाही वाटत आहे. शिवसेनेपेक्षा काँग्रेसला राष्ट्रवादी जवळची वाटते. त्यामुळे एकवेळ राष्ट्रवादीला ॲडजेस्ट केले जाईल मात्र शिवसेनेला मनपाच्या निवडणुकीत लांबच ठेवले जाईल असा राजकीय कयास आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com