
नागपूर : मेट्रोसह इतर सरकारी विभागात नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने ठकबाजाने सहा बेरोजगार युवक-युवतींची ३७ लाख ६२ हजार रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी अमोल गणेश जिभकाटे (वय २८, रा. हजारीपहाड)यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी फसवणूक आणि विविध कलमांसह गुन्हा दाखल केलेला आहे.