

Nagpur Gangwar Case MCOCA Accused Flees Medical Hospital Through Toilet Window Police File Case And Launch Manhunt
esakal
नागपूर: खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गॅंगवार प्रकरणात मकोकाअंर्गत कारवाई केलेला कुख्यात आरोपी शेख समीर शेख मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक दहामधील शौचालयाच्या खिडकीमधून शनिवारी (ता.१९) सकाळी दहा वाजता फरार झाला. या घटनेने पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.