नागपूर - विदर्भातील सिकलसेलबाधित रुग्णांना तातडीने आणि प्रभावी उपचार उपलब्ध व्हावे, या हेतूने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सिकलसेल वेलनेस हब उभारण्यात येणार आहे..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या या प्रकल्पाच्या हेतुपूर्तीसाठी नवो नोर्डिस्क एज्युकेशन फाउंडेशन (एनएनईएफ) तर्फे सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून सिकलसेल वेलनेस हब उभारण्यासाठी ‘मेडिकल’शी सामंजस्य करार केला आहे. सिकलसेलबाधितांसाठी हे हब वरदान ठरणार आहे..सिकलसेल रुग्णांची शासकीय यंत्रणेत नोंदणी करून त्यांच्यासाठी प्रमाणित आणि दर्जेदार आरोग्य सेवा निर्माण करणे, ‘मेडिकल’मधील सिकलसेलवरील उपचारात्मक सुविधा बळकट करणे आणि बालमैत्री व रोगनिवारण केंद्र उभारणे, विविध माध्यमांतून जनजागृती वाढवणे, राज्यस्तरीय सिकलसेल व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात सहकार्य करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व क्षमता वृद्धीसाठी उपक्रम राबवणे, ठोस आकडेवारी संकलन करून धोरणात्मक शिफारशी सादर करणे, ही सिकलसेल वेलनेस हब प्रकल्पाची उद्दिष्टे असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली..वेळेत उपचारासाठी वेलनेस हबया केंद्रात सिकलसेल आजारावरील उपचाराची यंत्रणा उभारण्यात येईल. यात निदान, उपचार, नियमित निगा, आहारविषयक मार्गदर्शन, समुपदेशन, तसेच रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांसाठी शिक्षण शिबिरांचे आयोजनाचा समावेश असणार आहे. रुग्णांना केवळ उपचारच नव्हे तर जगण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक असलेली सर्वसमावेशक सेवा देणे या हबचा उद्देश असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी हे केंद्र वरदान ठरणार आहे. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागात विशेष तपासणी व जनजागृती शिबिरे घेण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले..प्रकल्पाची वैशिष्ट्येना नफा, ना तोटा तत्त्वावर राबविण्यात येईलसिकलसेल रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांसाठी शिबिरांचे आयोजन करणारसिकलसेल रुग्णांच्या नोंदणीसाठी विशेष संगणक प्रणालीची निर्मिती व माहिती व्यवस्थापनतज्ज्ञांच्या मदतीने सिकलसेलसाठी प्रोटोकॉल तयार करणेबालरुग्णांसाठी अनुकूल केंद्राची संरचना करणेसिकलसेल रुग्णांसाठी विशेष समुपदेशकांची नेमणूक करणे.या सुविधा मिळणारकेंद्रात मुलांसाठी डिझाइन असलेले वॉल ग्राफिक्समुलांसाठी फ्लोअर मॅटिंगवजन मोजण्यासाठी मशिनउंची मोजण्यासाठी स्टॅडिओमीटररक्तदाब मोजण्याचे यंत्रइलेक्ट्रोफोरेसिस यंत्रसिकलसेल निदानासाठी वातानुकूलित यंत्रणारुग्ण व पालकांसाठी शैक्षणिक साहित्यलहान मुलांसाठी खेळणी व शैक्षणिक साधनेटेलिकन्सल्टेशन.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.