Nagpur : नागपुरातील बेपत्ता मुलगा अकोल्यात मृत आढळला

रेल्वेतून खाली पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे
nagpur Crime News
nagpur Crime Newsesakal
Summary

रेल्वेतून खाली पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे

अकोला : बोरगाव मंजू पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या काटेपूर्णा रेल्वे स्टेशन जवळील नदिपात्रात एका युवकाचा मृतदेह गुरुवारी काट्याच्या झुडपात दिसला. हा मुलगा रेल्वेतून खाली पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तो नागपूर येथील रहिवाशी आहे.

तानखेड येथील रहिवासी नदीवर जात असताना गुरुवारी त्यांना काट्याच्या झुडपात मृतदेह आढळला. त्यांनी ही माहिती गावातील पोलिस पाटील राजकुमार वानखडे यांना दिली. त्यांनी लगेच काटेपूर्णा रेल्वे स्टेशनवर व बोरगाव मंजू पोलिस स्टेशनला कळवले. त्यानंतर बोरगाव मंजू पोलिस व आरपीएफ घटनास्थळी दाखल झाले.

पंचनामा केला असता मृतकाजवळ पाकिटामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो व नागपूर रेल्वे स्टेशनचे प्लॉट फार्ममचे तिकीट व रेल्वे स्टेशनवर दुचाकी पार्किंगला लावल्याची पावतीसह फुटलेल्या अवस्थेत मोबाईल आढळला. यावरुन मृतकाचे नाव विनय प्रवीण पितरोडा (वय १९ वर्ष. कळमना रोड ,हनुमान मंदिर जवळ, गुजराती कॉलनी, भारत नगर) नागपूर येथील रहिवासी असल्याचे आधारकार्डवरून समजते. प्राथमिक तपासणीत मृतक चालू रेल्वेमधूनखाली पडल्याचे दिसते.

पोलिसांनी मोबाइलमधील सिमकार्ड मध्ये असलेल्या फोन नंबरवरून संपर्क केला असता. मुलगा दोन दिवसांपासून घरून निघून गेला असल्याची घरच्यांनी तक्रार कळमानी पोलिस स्टेशन नागपूर येथे केल्याचे बहिणीने फोनवर बोलताना सांगितले. घरात बहीण, भाऊ व वडिलच असल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथे सामान्य रुग्णालयात पाठविला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com