नागपूर : घरावर वीज कोसळली

शनिवारपासून मुसळधारेचा इशारा
Nagpur monsoon heavy rain lightning damage home
Nagpur monsoon heavy rain lightning damage homesakal

नागपूर : सोमवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे गंगाबाई घाटामागे असलेल्या गुजरनगर येथील कौसल्याबाई दुपारे यांच्या घरावर वीज पडली. यात घराचे नुकसान झाले असले तरी कुणालाही दुखापत झाली नाही.

सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. समाजजेवक विनोद इंगोले यांनी याची माहिती तहसीलदार पाटील यांना कळविली. त्यानुसार पटवाऱ्याने पाहणी करून अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर केला. दुपारे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून त्यांना तत्काळ मुख्यमंत्री सहायता निधीतून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विनोद इंगोले यांनी केली आहे.

शनिवारपासून मुसळधारेचा इशारा

नागपूर गेल्या काही दिवसांपासून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या उपराजधानीत काल (सोमवारी) वरुणराजाने दमदार एंट्री मारली. पहिल्या पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावल्याने १८ तासांमध्ये शहरात तब्बल ८० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. सोमवारी उशिरा रात्रीपर्यंत मेघगर्जनेसह धो-धो बरसल्यानंतर पावसाने आज काहीशी उसंत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com