esakal | मेळघाटच्या दिमतीला ४८ डॉक्टरांची फौज! वैद्यकीय सेवेचा पॅटर्न राज्यभरात ठरणार आदर्शवत
sakal

बोलून बातमी शोधा

मेळघाटच्या दिमतीला 48 डॉक्टरांची फौज

सध्या या मंचातील डॉक्टर मेळघाट दौऱ्यावर निघाले आहेत. त्यात जवळपास ४८ डॉक्टरांचा समावेश असून ते विनामूल्य सेवा देणार आहेत.

मेळघाटच्या दिमतीला 48 डॉक्टरांची फौज

sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर (अमरावती) : काहीसा माणुसकीचा झरा सध्या जुळ्या शहरातील सामाजिक सद्भावना मंचसोबत (samajik sadbhavana manch) जुळलेल्या डॉक्टरांमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या या मंचातील डॉक्टर मेळघाट दौऱ्यावर निघाले आहेत. त्यात जवळपास ४८ डॉक्टरांचा (48 Doctors) समावेश असून ते विनामूल्य सेवा (free services) देणार आहेत.

हेही वाचा: अमरावती जिल्ह्याला केवळ 212 रेमडेसिव्हिरचा पुरवठा; डॉक्‍टरांसमोर प्रश्‍नचिन्ह

हल्ली स्वार्थी युगात माणुसकी लोप पावत चालली आहे, असे आपण बहुतांशी बोलत असतो. असे असतानाही काही वेगळे अनुभव येतात, त्यामुळे वाटते की संस्काराची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. ती नष्ट होणार नाही, माणुसकीचा ओलावा अजूनही झिरपत आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून मनापासून प्रामाणिकपणे विनामूल्य सेवा देणारे डॉक्टर आज ईश्वराचे दुसरे रूप मानले जातात.

हेही वाचा: अमरावती जिल्ह्यातील जि.प.च्या शाळांना मिळेना हक्काचे छप्पर

कोरोनाच्या महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून ते रुग्णांचे जीव वाचवीत आहेत. सध्या कोरोनाचे संकट कमी झाले. सध्या ग्रामीण भागात अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णसेवेत अडचणी येत आहेत. याचा विचार करून जुळ्या शहरातील खासगी डॉक्टरांनी ग्रामीण भागात रुग्णांची मोफत सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात अचलपूर तालुक्यातील बहुतांश गावांत विनामूल्य सेवा दिल्यानंतर आता या डॉक्टरांचा मोर्चा मेळघाटकडे निघाला आहे. यावेळी जवळपास ४८ डॉक्टरांची फौज मेळघाटच्या दिमतीला असणार आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. सध्या डॉक्टरांच्या विनामूल्य सेवेच्या कार्याचे, निर्णयाचे सर्वत्र स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा: भाकरी महागली! सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसं?

हेही वाचा: संचारबंदीत रस्त्यावर आरटीपीसीआर चाचणी; अमरावती महापालिकेचा उपक्रम

सामाजिक सद्भावना मंचच्या वतीने आता मेळघाटातील गावांना सेवा देण्यासोबतच अंधश्रद्धा निर्मूलन, कुपोषण, महिलांच्या संबंधित मासिक पाळी व हायजीन यावर मार्गदर्शन तसेच प्रबोधन करण्यात येणार आहे. सोबतच तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून गंभीर आजाराचे निदान करून रुग्णांना महात्मा जोतिबा फुले योजना आणि प्रधानमंत्री योजनेंतर्गत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करून मिळणार आहे.

-डॉ. राम ठाकरे,अध्यक्ष, सामाजिक सद्भावना मंच.

loading image