Nagpur and Kalyan-Dombivli Meat Shop Ban on Independence Day : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने १५ ऑगस्ट रोजी चिकन, मटनाची दुकाने आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला असून, हा मुद्दा आता अधिक तापण्याची शक्यता आहे. कारण आता नागपूर महापालिकेनेही आपल्या हद्दीतील सर्व चिकन, मटनाची दुकाने आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे निर्देश जारी केले आहेत, ज्यामुळे मांस विक्रेते आणि नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.