Nagpur: फुटपाथ दुकानदारांकडून अधिकारी घेतायत 'हप्ता', राष्ट्रवादीकडून निलंबनाची मागणी, आयुक्तांना निवेदन

फुटपाथ दुकानदारांकडून महिन्याला पाचशे रुपये हप्ता घेणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
accepting bribe crime
accepting bribe crimeesakal

Nagpur News: फुटपाथ दुकानदारांकडून महिन्याला पाचशे रुपये हप्ता घेणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.


राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांना निवेदन देण्यात आले. यात फुटपाथवरील दुकानदार व फेरीवाल्यांकडून हप्ते घेतले जात असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

शहरातील नागरिकांच्या समस्या, कर आकारणी, फुटपाथवरील अतिक्रमण, सामान्य जनतेच्या घरावर अतिक्रमणाच्या नावावर चुकीच्या पद्धतीने कारवाई, अनधिकृत बांधकामाला आश्रय यासंदर्भातील समस्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. फुटपाथ दुकानदारांकडून हप्ता घेणाऱ्या धमरपेठ झोनमधील मनाच्या अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. (Latest Marathi News)


प्रशांत पवार यांच्यासह कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर, प्रदेश संघटक सचिव हाजी सोहेल पटेल, माजी नगरसेवक राजेश माटे, सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष अरविंद ढेंगरे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष वसीम अन्सारी, उत्तर नागपूर अध्यक्ष राकेश बोरीकर, मुमताज बाजी, अखतर हुसेन, बबलू पठाण, अलताफ हुसेन, रमजान अन्सारी, जावेद अन्सारी, शमी सिद्दकी, मोहम्मद इमरान, इरफान सिद्दिकी, निसार ताजी, किरण खिरडसे आदी उपस्थित होते.

accepting bribe crime
Lakhbir Singh Landa : कॅनडातील खलीस्तानवाद्यांविरोधात भारत आक्रमक! बब्बर खालसाचा लखबीर सिंग लांडा दहशतवादी घोषित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com