esakal | 'ती आमची हद्द नाही, आम्ही शव नेणार नाही'; शेवटी नातेवाइकांनीच केले अंत्यसंस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

corona dead

'ती आमची हद्द नाही, आम्ही शव नेणार नाही'; शेवटी नातेवाइकांनीच केले अंत्यसंस्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : खाट उपलब्ध नसल्याने शासकीय रुग्णालयातून परत घरी नेले. कारण खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च करणे शक्य नव्हते. अखेर या कोरोनाबाधित महिला रुग्णाचा घरीच मृत्यू झाला. शव नेण्यासाठी महानगरपालिकेला फोन केला. पण दिघोरी हा भाग आमच्या हद्दीत येत नसल्याचे सांगितल्याने अखेर नातेवाइकांनीच अंत्यसंस्कार उरकले.

हेही वाचा: व्हीआयपींच्या एका फोनवर मिळतो लसीचा डोस; सामान्यांना मात्र बाहेरचा रस्ता; नागपुरातील वास्तव

कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी खासगीत मोठ्या प्रमाणात पैशाची गरज आहे. त्यात मेडिकल, मेयोत खाटा फुल्ल आहेत. यामुळे नाइलाजास्तव कोरोनाबाधित घरीच उपचार घेत आहेत. दिघोरी येथील श्री साईनगर येथील रहिवासी असलेल्या ज्योती मुर्साकर यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. मृतक महिलेचा मुलगा लोकेश मुर्साकर यांनी दिलेल्या माहितीनुसार १७ एप्रिल रोजी सीटी स्कॅन करण्यात आले. ज्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे दिसून आले. यानंतर उपचारासाठी रूग्ण महिलेस मेडिकल आणि मेयोत नेले. मात्र, खाटा शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. खासगी रुग्णालयात ८० हजार रुपये भरा असे सांगण्यात आले. पैसे नसल्यामुळे अखेर आईला घरीच ठेवले होते. मानकापूर येथील डॉक्टरांकडून उपचार मिळवा, ऑक्सिजनची गरज भासल्यास सिलेंडर घरी आणा. मात्र, सिलिंडरही मिळाले नाही. यानंतर त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावली. अखेर त्यांचा मृत्यू झाला.

मृतदेह नेण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन केला. मात्र, हा भाग ग्रामीण आहे. हे क्षेत्र महापालिकेच्या हद्दीत येत नाही, यामुळे शव उचलण्यासाठी जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. पंचायत सचिवांनी फोन केला, परंतु गाडी आली नाही. अखेर रात्री उशीरा खासगी गाडीतून दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
-लोकेस मुर्साकर, मृतक महिलेचा मुलगा
loading image