Nagpur Municipal Meeting Shifted to Nitin Gadkari
esakal
नागपूर : शहरातील विकास प्रकल्प, रखडलेली कामे आणि विविध समस्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या मुख्यालयात होणाऱ्या बैठकीचे स्थळ बदलण्यात आले आहे. ही बैठक आता नितीन गडकरी यांच्या घरी होणार आहे. त्यामुळे विरोधीक्षाचे आमदार आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते या बैठकीला जाणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.