Nagpur : आता महापालिका कशाच्या बळावर लढायची ; उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक चिंतेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने तशीही शिवसेना अर्धी झाली आहे.
Nagpur municipality
Nagpur municipalitysakal

नागपूर : शिवसेनेचा धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याने उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक चांगलेच संभ्रमात सापडले आहेत. चिन्हाचा फटका ग्रामीण भागातील निवडणुकीमध्ये बसणार असल्याचा धोका उद्धव यांच्या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. दुसरीकडे भाजपच्या कटकास्थानामुळे सहानुभूती मिळेल अशी आशाही त्यांना वाटत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने तशीही शिवसेना अर्धी झाली आहे. ४० आमदार आणि १३ खासदारांनी आधीच उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे आपसूकच शहर व गावांमधील कार्यकर्तेही विभागल्या गेले आहेत. आता शिवसेना आणि धनुष्यबाणही गेल्याने लढायचे कसे असा प्रश्न अनेकांना सतावत आहे.

विदर्भात याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विदर्भात एकही खासदार आणि आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे शिल्लक राहिलेला नाही. नागपूर महापालिकेचा विचार करता अवघे दोन नगरसेवक शिवसेनेत आहेत. माजी नगरसेवक किशोर कुमेरिया आणि मंगला गवरे यांची मुख्य ताकद शिवसेना हीच होती. याच बळावर ते निवडून येत होते.

आता महापालिका कशाच्या बळावर लढायची

महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर निवडून येतील असे आठ दहा उमेदवार शिवसेनकडे आहेत. मात्र शिंदे यांचे उमेदवारही रिंगणात राहणार असल्याने मतविभाजनाचा धोकाही त्यांना आहे. उद्धव ठाकरे यांच्या नागपूरच्या कार्यकारिणीत बरेच वाद आहेत.

दोन ते तीन गट आहेत. काहीजण शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. जे सध्या पदाधिकारी आहेत त्यापैकी बोटावर मोजण्या इतक्या शिवसैनिकांची निवडून येण्याची ऐपत आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेस त्यांच्यासाठी जागा सोडण्याची शक्यता कमीच आहे. काही जागा सोडल्या तरी बंडखोरीची शक्यता जास्त आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नावावर लढताना कार्यकर्त्यांना यंदाच्या महापालिकेच्या निवडणुकीत बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे दिसून येते.

या संदर्भात पूर्व विदर्भाचे संघटक सतीश हरडे यांच्यासोबत संपर्क साधला असता ते म्हणाले, या सर्व घडामोंडीमुळे उद्वव ठाकरे यांच्यापेक्षा भाजपलाच जास्त फटका बसणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय चुकीचाच नव्हे तर पक्षापाती असल्याचे मत जनतेचे आहे. हे सर्व भाजप नेत्यांच्या दाबावाखाली सुरू असल्याचे जनतेला कळले आहे.

भाजपनेच सर्वकाही सत्तेसाठी घडवून आणले आहे असे लोकांना वाटते. आमचे जे काही नुकसान व्हायचे ते आधीच झाले. ज्यांना जायचे होते ते आधीच निघून गेले. आता कोणी पक्ष सोडून जाईल असे वाटत नाही. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला लढा देण्यास सांगितले. निष्ठावान शिवसैनिकांसाठी हा संदेश महत्त्वाचा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com