Nagpur : नाना पटोले, प्रफुल्ल पटेल आज एकाच व्यासपीठावर

मविआची आज बैठक शिक्षक मतदारसंघात चुरस
नाना पटोले, प्रफुल्ल पटेल
नाना पटोले, प्रफुल्ल पटेलsakal

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. शुक्रवारी प्रफुल्ल पटेल यांनी ‘मी स्टॅन्डर्ड लोकांवर बोलतो’, असे नमूद करीत नाना पटोले यांना टोला हाणला. त्यावर पटोले यांनीही आज ‘मी गरीब माणूस आहे, त्यांच्या स्टॅन्डर्डचा नाही’, असे नमूद केले. मात्र शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्त आयोजित महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्या रविवारी हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार आहे. यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या ३० जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप व मित्र पक्ष जोमाने कामाला लागले. त्या तुलनेत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांना समर्थन देण्यासाठी काँग्रेसने विलंब केला. त्यामुळे त्यांच्या रणनीतीसाठीही विलंब होत आहे. रविवारी सिव्हिल लाईन्स येथील जवाहर विद्यार्थी गृह येथे अडबाले यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.

या बैठकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विदर्भातील सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह खासदार बाळू धानोरकर, आशिष दुवा, माजी मंत्री नितीन राऊत, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार सर्वश्री रणजित कांबळे, सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर, राजू पारवे, राजू कारेमोरे, राष्ट्रवादीचे धर्मराव आत्राम, मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया,

गडचिरोलीचे कॉंग्रेस शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यासह विदर्भातील सर्व राष्ट्रवादीचे नेते, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद मानमोडे, ग्रामीणचे प्रमुख राजेंद्र हरणे यांच्यासह पूर्व विदर्भातील जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय माजी खासदार, माजी आमदार उपस्थित राहणार आहे. महाविकास आघाडीच्या या बैठकीत अडबाले यांच्यासाठी रणनिती ठरणार आहे. भाजपने प्रचाराला सुरुवात केली असून आपच्या उमेदवारासह २२ उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या रणनितीनंतर निवडणुकीत चुरस वाढणार असल्याचे संकेत मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com