Nagpur : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे आज लोकार्पण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस sakal

नागपूर : मध्य भारतातील कॅन्सरग्रस्तांसाठी उभारलेल्या जामठा परिसरातील धर्मादाय तत्त्वावरील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे गुरुवारी (ता.२७) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहणार होते. पण त्यांचा दौरा रद्द झाल्याचे समजते.

डॉ आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्यावतीने संचालित नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात सकाळी साडेदहा वाजता हा लोकार्पण सोहळा होणार आहे. तब्बल २५ एकर परिसरात व्यापलेल्या या रुग्णालयात ४७० खाटांची सोय आहे. सध्या या ठिकाणी रुग्णसेवा सुरू असून अल्पावधीतच दुर्धर कॅन्सरवर प्रभावी उपचार सुरू होतील. १८ ऑगस्ट २०१२ मध्ये या संस्थेची घोषणा करण्यात आली.

त्यानंतर २८ फेब्रुवारी २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संस्थेचे भूमिपूजन झाले. २०१७ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. त्यानंतर २०१८ मध्ये २७ मुलांच्या कॅन्सरवरील उपचारासाठी स्वतंत्र असा वॅार्ड सुरू करण्यात आला. २०२० मध्ये विप्रोचे माजी अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी या संस्थेला भेट दिली.

आयुष्यमती उपक्रमाला प्रतिसाद

२०२० मध्ये कॅन्सरविषयी महिलांच्या मनातील भीती नष्ट व्हावी, यासाठी ‘आयुष्यमती’ या अनोखा उपक्रम नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये सुरू करण्यात आला आहे. कॅन्सरवर मात करणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. संपूर्ण सोईसुविधायुक्त इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com