नागपूर : संभाजी राजेंची राजकीय कोंडी

देवेंद्र फडणवीस : राष्ट्रवादी-शिवसेनेने विषय भरकटवला
Nagpur Rajya sabha Sambhaji Raje Devendra Fadnavis
Nagpur Rajya sabha Sambhaji Raje Devendra Fadnavis sakal

नागपूर : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने छत्रपती संभाजी राजे यांची राजकीय कोंडी केली जात असल्याचा आरोप होत आहे. हा विषय त्यांच्या पक्षाचा असल्याचे सांगून माजी मुख्यमंत्री तसेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. मात्र हा विषय शरद पवारांनी सुरू केला आणि शिवसेनेने तो वेगळ्याच मार्गाने नेल्याचा आरोपही त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वप्रथम छत्रपती संभाजी राजे यांना समर्थन जाहीर केले होते. आता शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करायची असल्याचे ते सांगतात. दुसरीकडे शिवसेनेने त्यांना पक्षात येण्याची अट घातली. त्यामुळे छत्रपतींची राजकीय कोंडी झाली आहे. सुरवातीलाच स्पष्ट भूमिका घेतली असती तर त्यांनी वेगळा मार्ग निवडला असता असेही फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.

छत्रपतींनी शिवसेनेला समर्थन मागितले आहे. त्यांनी सुरवातीलाच आपण अपक्ष लढणार असे जाहीर केले होते. उद्धव ठाकरे यांचीसुद्धा त्यांनी भेट घेतली. मात्र शिवबंधन बांधण्याची अट घालण्यात आली. त्यांनी नकार देताच दुसऱ्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले. दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांचे नाव निश्चित केले आहे. संभाजी राजे यांच्या समर्थकांनी शिवसेनेने दगाफटका केल्याचा आरोप केला आहे.

या सर्व घडामोडींवर फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाना साधला. आधी शरद पवारांनी हा सगळा विषय सुरू केला. त्यानंतर वेगळ्याच दिशेने हा विषय गेला. आता एक वेगळ्या प्रकारचा हा सर्व विषय झालेला आहे. पण तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर मी बोलण्याचे कारण नसल्याचे फडणवीस म्हणाले.

आघाडीमुळे महागाई

सगळ्यात जास्त महागाई वाढवण्याचे काम आघाडी सरकार करीत आहे. पेट्रोल-डिझेलवर राज्याचा कर २९ रुपये व केंद्राचा कर १९ रुपये आहे. राज्याचा कर ते का कमी करत नाहीत? आधी शरद पवार यांनी यावर बोलावे. यासह २९ रुपये कर पेट्रोल-डिझेलवर लावून एक रुपयाही कमी न करता हे लोक महागाईवर कसे बोलू शकतात? याचे आपणास आश्चर्य वाटते, असेही फडणवीस म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com