Belgian Dog in Police: पोलीस दलात 'किबा'ची एंट्री, बेल्जीयन मॅलेनियस प्रजातीचा श्वान, गुन्हेगारांना बसणार आळा

पोलीस दलातील डॉग युनिटमध्ये बेल्जीयन मॅलेनियस प्रजातीच्या ‘किबा’चे आगमन झाले आहे. त्यामुळे गुन्हेगारीस आळा घालण्यास मदत होणार असून पोलिसांना श्वानाची मोलाची मदत सुद्धा मिळणार आहे.
Gog Squad
Gog Squad Esakal

Belgian Malenius Dogs in Police Dog Squad: पोलीस दलातील डॉग युनिटमध्ये बेल्जीयन मॅलेनियस प्रजातीच्या ‘किबा’चे आगमन झाले आहे. त्यामुळे गुन्हेगारीस आळा घालण्यास मदत होणार असून पोलिसांना श्वानाची मोलाची मदत सुद्धा मिळणार आहे.

पोलिस दलामध्ये खून, दरोडा, घरफोडी, चोरी, बेपत्ता तपासामध्ये गुन्हेगारांचा शोध घेणे तसेच व्हिआयपी व्यक्तींच्या दौऱ्यादरम्यान तपासणी करण्यासाठी श्वान पथक मोलाची कामगिरी बजावत असते. यापूर्वी पोलिस दलामध्ये कार्यरत असलेल्या ‘जोया’ या श्वानाने पिंजर पोलिस स्टेशन येथील बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलास शोधून काढले होते.

त्यासोबतच खुनाचा गुन्हा उघडकीस आणला होता. श्वान ‘लुसी’ ही अमली पदार्थ शोधक असून तिने आजपर्यंत भरपूर अमली पदार्थांचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. ‘लक्ष्मी’ नावाच्या श्वानाने सुद्धा कार्यकाळात उत्कृष्ठ कामगिरी केली असून खून, दरोडा, घरफोडी, चोरी, बेपत्ताचे प्रकरण उघडकीस आणले आहेत. (Latest Marathi News)

दरम्यान २४ जानेवारी रोजी ‘लक्ष्मी’ ही श्वान सेवानिवृत्त झाल्याने तिच्या जागी २६ फेब्रुवारी रोजी ‘बेल्जीयम मेलेनॉईज’ या नवीन प्रगत प्रजातीच्या श्वानाची डॉग युनिटमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

Gog Squad
Tejaswi Yadav Convoy Accident: तेजस्वी यादव यांच्या ताफ्याचा मोठा अपघात; एकाचा मृत्यू, ६ जखमी

‘किबा’ म्हणजेच सुरक्षा
‘किबा’ म्हणजेच सुरक्षा होत असल्याने सदर प्रगत प्रजातीच्या श्वानाचे ‘किवा’ म्हणून नामकरण करण्यात आले आहे. सदर जातीचे श्वान हे देश-विदेशात संरक्षण क्षेत्रात तसेच पोलिस विभागामध्ये सेवा देते. (Latest Marathi News)

संरक्षण क्षेत्र, गुन्हेगारी शोध तसेच तपासामध्ये पुरावे गोळा करण्याकरीता प्रगत प्रजातीचे श्वानाचा हतखंडा असून सदर श्वान हे अतिशय विवेक बुध्दीने, कुशल कामगिरी करण्याकरीता ओळखले जाते. तिला उच्च प्रतिचे शिक्षण देवून जिल्ह्यातील गुन्हेगारीस आळा घालण्याकरीता श्वानाचे मोलाचे योगदान मिळणार आहे.

Gog Squad
Manoj Jarange: सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये! मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल, काय आहे कारण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com