Koradi Mahalaxmi temple iron gate collapse : कोराडी येथील महालक्ष्मी मंदिरातील मुख्य प्रवेशाचे गेटवरील स्लॅबचे काम सुरू असताना, अचानक गेट पडल्याने त्याखाली मजूर दबल्याने भीषण अपघात झाला. ही घटना शनिवारी (ता.९) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत १७ मजूर गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी परिसरात बचावकार्य सुरू केले आहे.